अभिनेते नसीरुद्दीन शाह हे एक बहुआयामी अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्ष सर्वांनाच ते भुरळ घालत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचा मुलगा विवान शाह हा देखील मनोरंजन सृष्टी उत्कृष्ट कार्य करत आहे. नसीरुद्दीन शाह यांच्या प्रमाणे विवानच्याही कामाचे प्रेक्षक कौतुक करत असतात. कामाप्रमाणेच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो.

सध्या विवानच्या लवहलाईफची खूप चर्चा रंगली आहे. गेले काही महिने तो एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याचे आता समोर आले आहे. ही अभिनेत्री म्हणजे करिष्मा शर्मा.

आणखी वाचा : “तुमच्या मूर्खपणामुळे निर्मात्यांना…”; ‘लाल सिंग चड्ढा’ बॉयकॉट करणाऱ्यांवर संतापला अभिनेता मानव विज

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार जुलै २०२१ मध्ये त्या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यातली ओळख वाढत गेली त्यांची छान मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु या वर्षाच्या सुरुवातीला त्या दोघांनी रिलेशनशिपमधून ब्रेक घेतला होता. परंतु आता या दोघांचं नातं आधीपेक्षा खूप चांगलं झालं असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा : तिन्ही खानांच्या मौनावळीवर नसीरुद्दीन शाह यांची टीका ; विरोधी भूमिका घेणारे अडचणीत ; देशात कृतक देशभक्तीचे वातावरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करिष्माला याबद्दल विचारलं गेलं असता ती लाजली. तिने सांगितलं की, “विवान खूप चांगला मुलगा आहे. तो खूप प्रेमळ आहे. माझ्या आईचाही तो लाडका आहे. गेल्या वर्षी माझ्या वडिलांचे निधन झालं तेव्हा त्याच्या संपूर्ण कुटुंबाने मला खूप चांगली साथ दिली. त्यांचं कुटुंब हे माझं कुटुंब आहे.” तर दुसरीकडे विवानने याबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला. त्यामुळे करिष्मा नसीरुद्दीन शाह यांची सून होणार का, हे येत्या काही दिवसातच कळेल.