Nawazuddin Siddiqui Interview : आपल्या दमदार अभिनयाने फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दिन सिद्दिकी होय. नवाजुद्दिनने त्याच्या करिअरमध्ये विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आपल्या अभिनयाबरोबरच नवाजुद्दिन वैयक्तिक आयुष्यातील वादांमुळेही चर्चेत राहिला. त्याच्या व पत्नी आलिया सिद्दिकीच्या नात्यात तणाव आल्याने तो वादात अडकला. घरातील भांडणांबद्दल दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांवर आरोप केले. अखेर दोघांनी वाद मिटवले आणि नवाजुद्दिनने पुन्हा त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं.

द सुविर सरन शोमध्ये नवाजुद्दिन सिद्दिकीने त्याचे चित्रपट, वैयक्तिक आयुष्य आणि वादानंतर पुनरागमन यावर मनमोकळेपणाने संवाद साधला. पाहा त्याची लाइव्ह मुलाखत –