बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. अभिनयाच्या जोरावर नवाजने बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाज त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. मात्र, नवाजला त्याच्या खासगी आयुष्याबाबत चर्चा करायला जास्त आवडत नाही. नवाजला एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलीचे नाव शोरा सिद्दीकी असून, मुलाचे नाव यानी सिद्दीकी आहे.

सोशल मीडियावर नवाज मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. व्यग्र वेळापत्रकामधून नवाज अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबर वेळ व्यतीत करताना दिसतो. अनेकदा तो त्याची मुलगी शोराबरोबरचे काही फोटो व व्हिडीओ शेअर करीत असतो. काही दिवसांपूर्वीच तिचा वाढदिवस झाला. लेकीच्या वाढदिवसानिमित्त नवाजने इन्स्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली होती. दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत नवाजने शोराबाबत अनेक खुलासे केले आहेत.

हेही वाचा- अबू धाबीतील पहिल्या हिंदू मंदिरात अक्षय कुमारने घेतले दर्शन; पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालंय लोकार्पण

अलीकडेच त्याने अनफिल्टर्ड बाय समधिश या यूट्युब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, नवाजने शोराबाबतचा एक किस्साही सांगितला आहे. नवाज म्हणाला, “काही दिवसांपूर्वी शोरा मला दुबईतील एका मॉलमध्ये घेऊन गेली. तिथे तिने एक लहान बॅग विकत घेऊन देण्याचा हट्ट केला. मला वाटले की, ही एक छोटी बॅग आहे. २० ते २५ हजार रुपयांची असेल; पण जेव्हा मला तिने त्या बॅगेची किंमत सांगितली तेव्हा मला धक्काच बसला. तिला लुई व्हिटॉनची बॅग घ्यायची होती; जी खूप महाग होती. त्याची किंमत दोन लाख रुपये होती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवाजुद्दीनच्या कामाबाबत बोलायचे झाले, तर गेल्या काही महिन्यांत त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. नुकताच त्याचा ‘सैंधव’ नावाचा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात नवाजबरोबर साऊथचा सुपरस्टार व्यंकटेश, आर्या, श्रद्धा श्रीनाथ, रुहानी शर्मा, आंद्रिया जेरेमिया, सारा, जयप्रकाश यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच त्याचा सेक्शन १०८ चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अरबाज खानची प्रमुख भूमिका आहे.