Nawazuddin Siddiquis 15 year old daughter Shora: बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या विविध भूमिकांसाठी ओळखला जातो. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या ‘सरफरोश’ चित्रपटातून अभिनेत्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. २०१२ ला साली प्रदर्शित झालेल्या ‘पतंग’ या चित्रपटात अभिनेत्याने पहिल्यांदा प्रमुख भूमिका साकारली होती.
२००४ साली प्रदर्शित झालेल्या ब्लॅक फ्रायडे आणि २०१२ प्रदर्शित झालेल्या गँग्स ऑफ वासेपुरमधील अभिनेत्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. सध्या तो चित्रपटांसह वेब सीरीजमध्येदेखील काम करताना दिसतो. त्याच्या भूमिकांना प्रेक्षक दाद देताना दिसतात. आता मात्र अभिनेता त्याच्या भूमिकांमुळे नाही तर त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.
शोराची ऑडिशन क्लिप झाली व्हायरल
अभिनेत्याने त्याच्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ अभिनेत्याच्या मुलीची शोराची ऑ़डिशन क्लिप आहे. यामध्ये ती इंग्रजी डायलॉग बोलताना दिसत आहे. हे डायलॉग म्हणताना शोरमध्ये आत्मविश्वास दिसत आहे. नेटकरी तिच्या या आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत. गेल्या वर्षी शोरा सिद्दीकीने लंडनमधील वेस्ट एंड स्टेज – थिएटर समर स्कूलमध्ये ‘ब्युटी अँड द बीस्ट’मध्ये काम केले आहे. सध्या ती लंडनमध्ये अभिनयाचे शिक्षण घेत आहे. ती मुंबईत अनेकदा नवाजुद्दीनबरोबर कार्यक्रमांमध्ये दिसली आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीने २००९ मध्ये आलिया सिद्दीकीने लग्न केले आणि त्यांना शोरा आणि यानी ही दोन मुले आहेत. शोरा सिद्दीकी आता १५ वर्षांची आहे. ती अनेकदा मुंबईत चित्रपटांशी संबंधित कार्यक्रमांमध्ये नवाजुद्दीनसोबत दिसली आहे.
लंडनमध्ये शोरा अभिनयाते प्रशिक्षण घेत असल्याबाबत नवाजुद्दीन सिद्दीकीने वक्तव्य केले होते. गेल्या वर्षी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला होता की तुम्हाला कदाचित माहिती नसलेल्या गोष्टी कार्यशाळा आणि प्रशिक्षण संस्था तुम्हाला शिकवू शकतात. शोरा इतक्या प्रतिष्ठित संस्थेतून शिकत असेल तर ते उत्तमच आहे. त्यामुळे तिच्या कारकिर्दीला फायदा होणार आहे. तज्ञ तुम्हाला जे शिकवतात त्यामुळे तुमचे मन अधिक बळकट होते. तुमच्या वैयक्तिक जीवनातील अनुभवातून तुम्हाला जे शिकण्यासाठी वर्षानुवर्षे लागली असतील, ते प्रशिक्षणामुळे तुम्हाला खूप कमी वेळात शिकायला मिळते, असे म्हणत अभिनेत्याने भावना व्यक्त केल्या होत्या.