लेक मसाबाच्या दुसऱ्या लग्नानंतर नीना गुप्ता भावूक; फोटो शेअर करत म्हणाल्या... | neena gupta reaction on daughter masaba gupta wedding with Satyadeep Misra | Loksatta

लेक मसाबाच्या दुसऱ्या लग्नानंतर नीना गुप्ता भावूक; फोटो शेअर करत म्हणाल्या…

अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकली आहे.

neena gupta on masaba gupta wedding
तिच्या लग्नातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो – इन्स्टाग्रामवरून साभार)

फॅशन डिझायनर आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकली आहे. मसाबा गुप्ताने सत्यदीप मिश्राशी लग्न केलं. तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिच्या लग्नाबद्दल माहिती दिली. मसाबाला तिचे बॉलिवूडमधील मित्रमैत्रिणी व चाहते लग्नाबद्दल शुभेच्छा देत आहेत.

नीना गुप्ता यांची लेक मसाबा दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; लेहेंगा व आईच्या दागिन्यांवर खिळल्या नजरा

मसाबाने फोटो पोस्ट करत “आज सकाळी मी माझ्या प्रेमाशी लग्न केलं आहे. येणारं आयुष्य प्रेम, शांती, स्थैर्य व सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावर हसू घेऊन येईल. आपलं आयुष्य छान असणार आहे. तू मला कॅप्शन लिहायला दिलंस यासाठी आभार” असं कॅप्शन दिलं होतं. तिने सत्यदीप मिश्राबरोबरचे दोन फोटो शेअर केले आहेत.

मसाबा गुप्ताने अदिती राव हैदरीच्या पहिल्या पतीशी केलंय दुसरं लग्न; जाणून घ्या कोण आहे सत्यदीप मिश्रा

मसाबाच्या लग्नाबदद्ल तिच्या आई नीना गुप्ता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आज माझ्या मुलीचं लग्न झालं, माझ्या मनात शांतता, आनंद, कृतज्ञता आणि प्रेम आहे, मुलीच्या लग्नाची बातमी तुम्हा सर्वांशी शेअर करत आहे,” असं नीना गुप्ता यांनी मसाबाबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे.

मसाबा गुप्ताच्या दुसऱ्या लग्नात वडील विवियन रिचर्ड्सची हजेरी; अभिनेत्रीने शेअर केलेला Family Photo पाहिलात का?

लग्नात मसाबाने पेस्टल बेबी पिंक शेडमधील लेहेंगा परिधान केला होता. तर, नीना गुप्ता पांढऱ्या ग्रीन प्रिंटेड साडीत सुंदर दिसत आहेत. मसाबाचं पहिलं लग्न मधू मंटेनाशी झालं होतं, पण दोघांचा काही वर्षांनी घटस्फोट झाला, त्यानंतर ती सत्यदीप मिश्राला डेट करत होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 13:23 IST
Next Story
Video:…अन् रणबीर कपूरने सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा फोनच फेकून दिला; व्हिडीओ व्हायरल