बॉलीवूड अभिनेत्री नीतू कपूर नेहमी चर्चेत असतात. नीतू कपूर सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात. नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या आलिया भट्टच्या ‘RRR’ या चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ (Naatu Naatu) या गाण्यावर नाचताना दिसत आहे. नीतूंसोबत अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनीही ताल धरत मस्त डान्स केला.

हेही वाचा- सलमानवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीच्या निधनाने मोठा धक्का, पोस्ट शेअर करत म्हणाला, “माझी प्रिय अद्दू…”

नीतू कपूर यांचा भन्नाट डान्स पाहून सगळेच आवाक् झाले आहेत. ६४ व्या वर्षातला नीतू कपूर यांचा फिटनेस आणि एनर्जी आजही अनेक तरुण अभिनेत्रींना लाजवेल. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुर यांनीही नीतू कपूरसोबत डान्स केला आहे. त्या दोघींच्या उत्साहाचे सगळेच कौतुक करत आहेत.

हेही वाचा- “ते दोघंही माझं…” अरबाज आणि सोहेलबद्दल सलमान खानचे मोठे वक्तव्य, म्हणाला…

पद्मिनी कोल्हापुरे यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “माझ्या आवडत्या नीतू कपूरसोबत ‘नाटू-नाटू’वर नृत्य.. हळूहळू तेथे पोहोचेनच, Instareels,” असे कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिले आहे. नीतू कपूर यांनी ही पोस्ट त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आहे आणि लिहिले आहे की, “त्यांनी जुन्या मैत्रिणीसोबत ‘नाटू-नाटू’वर सर्वोत्तम प्रयत्न केला.” या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. रामचरण आणि ज्युनियर एनटीआरही तुमच्यासमोर अपयशी ठरले आहेत, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीतू कपूर यांनी भावनिक पोस्ट लिहली होती. पोस्टमध्ये नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांचे जुने फोटो पोस्ट केले होते. अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर आलिया भट्टच्या मेट गाला २०२३ डेब्यूचा फोटो शेअर केला आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.