करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतीच या कार्यक्रमात बॉलीवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री नीतू कपूर आणि झीनत अमान यांनी हजेरी लावली होती. या भागात नीतू कपूर यांनी वैयक्तिक आयुष्य व पती ऋषी कपूर यांच्याबद्दलचे अनेक किस्से शेअर करत काही आठवणी सांगितल्या.

ऋषी कपूर शेवटच्या दिवसांमध्ये ल्युकेमिया या आजारावर उपचार घेत होते. या दिग्गज अभिनेत्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू होते. याविषयी सांगताना नीतू कपूर म्हणाल्या, “आयुष्यातील दु:खद घटना मी फारशा आठवत नाही. पण, आम्ही दोघांनी एकत्र न्यूयॉर्कमध्ये जो वेळ घालवला ते सगळे क्षण आजही मला आठवतात. त्या दिवसांत आम्ही दोघं एकत्र होतो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सुरुवातीच्या काळात मी जेव्हा यश चोप्रांबरोबर शूटिंग करायचे तेव्हा रात्री उशिरा पार्ट्या व्हायच्या. मी तेव्हा कोणत्याही पार्टीला जायचे नाही. कारण, ते (ऋषी कपूर) मला नेहमी सांगायचे घरी जा…पार्ट्यांमध्ये जाण्यास त्यांनी मनाई केली होती. तेव्हा माझ्या आयुष्यात दोन शिस्तबद्ध माणसं होती एक माझी आणि आणि दुसरे कडक शिस्तीचे माझे बॉयफ्रेंड ऋषी कपूर. यामुळे मी आयुष्यात कधीच पार्ट्यांना गेले नाही.”

हेही वाचा : “काही कार्यक्रमांमधून मी अत्यंत कुचका अन्…”, राज ठाकरेंच्या टोपणनावाच्या मुद्द्यावर मत मांडताना आनंद इंगळे स्पष्टच बोलले, म्हणाले…

ऋषी कपूर यांचं मुलगा रणबीर आणि लेक रिद्धिमाशी असलेल्या बॉण्डिंगबद्दल सांगताना नीतू कपूर म्हणाल्या, “घरी मुलांशी ते क्वचित कधीतरी मैत्रीपूर्वक वागायचे. पण, शेवटच्या दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी अचानक बदलल्या. चिंटू जी (ऋषी कपूर) माणूस म्हणून खूप चांगले होते. लोकांवर प्रेम करायला त्यांना फार आवडायचं. पण, त्यांनी कधीच त्यांच्या मनातलं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं नाही. नेहमी अंतर राखून वागायचे, काही वेळा ओरडायचे. त्यांना सगळ्यांबद्दल फक्त मनोमन आपुलकी वाटायची. यामुळे मुलांसह त्यांनी बऱ्याच गोष्टी गमावल्या. ते कधीच दोन्ही मुलांचे चांगले मित्र होऊ शकले नाहीत.”

हेही वाचा : आयरा खान – नुपूर शिखरेचा Liplock करतानाचा फोटो व्हायरल, ख्रिश्चन पद्धतीत पार पडला आमिर खानच्या लेकीचा विवाहसोहळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीतू कपूर पुढे म्हणाल्या, “चिंटू जी (ऋषी कपूर)यांच्या शेवटच्या दिवसांत या सगळ्या गोष्टी बदलल्या. त्यांनी व्यक्त व्हायला सुरुवात केली. त्यांच्या मनातलं प्रेम दाखवलं म्हणूनच तो काळ मी कधीच विसरू शकणार नाही.” दरम्यान, ल्युकेमिया आजाराशी प्रदीर्घ लढा दिल्यावर २०२० मध्ये मुंबईत ऋषी कपूर यांचं निधन झालं. या जोडप्याला रणबीर आणि रिद्धिमा कपूर अशी दोन मुलं आहेत.