ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल दोन गट पडल्याचं दिसतंयय. प्रभासच्या चाहत्यांनी चित्रपट ब्लॉकब्लस्टर असल्याचं म्हटलंय. पण, दुसरीकडे अनेकांना मात्र विविध कारणांनी हा चित्रपट फारसा आवडला नाही. त्यामुळे ते चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शकावर टीका करत आहेत.

हेही वाचा – ‘आदिपुरुष’मध्ये ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारली आहे शुर्पणखाची भूमिका, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का

प्रभासच्याच एका चाहत्याने चित्रपट आवडला नसल्याचं ट्विटरवर म्हटलं. “सर्वात वाईट चित्रपट. १८०० कोटीच्या क्लबमधील अभिनेत्याला तू अशा प्रकारे हाताळतोस का ओम राऊत? प्रभासचा चाहता या नात्याने मी अशा चित्रपटांना प्रोत्साहन देत नाही. प्रभासला अशा गोष्टींसाठी प्रोत्साहन देणे थांबवावे, अशी मी त्याच्या सर्व चाहत्यांना विनंती करतोय,” असं एका युजरने म्हटलंय.

“रावण अली खिलजी पायथन सापांशी खेळताना,” असं म्हणत एका युजरने चित्रपटातील सैफ अली खानचा एक फोटो शेअर केला आहे.

“टी शर्ट आणि मॉडर्न हेअरकटमध्ये रावण”, असं कॅप्शन देत एकाने आदिपुरुषमधील रावण व रामायणातील रावणाची तुलना केली आहे.

“रामानंद सागर स्वर्गातून आदिपुरुष बघताना,” असं म्हणत एका युजरने मीम शेअर केलंय.

एका युजरने तर आदिपुरुषला प्रभासच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट चित्रपट म्हटलंय.

एका युजरने तर ओम राऊतला चित्रपट बनवणं थांबवण्याची विनंती केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘आदिपुरुष’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा असल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.