अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनॉनचा ‘भेडिया’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्या दोघांचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. वरुण आणि क्रितीदेखील सेटवरील फोटो पोस्ट करत वेळोवेळी चाहत्यांना चित्रपटाचे अपडेट्स देत होते. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील त्या दोघांचे लूक्स समोर आले होते. या ट्रेलरलाही लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. इतकंच नाही तर तर लोकांनी या चित्रटपटातील व्हीएफएक्सची प्रशंसाही केली.

ट्रेलरमध्ये अॅक्शन आणि कॉमेडीचं जबरदस्त मिश्रण दिसून येत आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या ट्रेलरवर नेटकरी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी मात्र वरुणचा हा चित्रपट महेश भट्ट यांच्या चित्रपटाची कॉपी असल्याचं दर्शवून दिलं आहे. १९९२ सालच्या महेश भट्ट दिग्दर्शित ‘जुनून’ या चित्रपटाशी वरुणच्या ‘भेडिया’ची तुलना करताना सोशल मीडियावर दिसत आहे.

आणखी वाचा : “तू या चित्रपटात कॉमेडी…” वरुण धवनने सांगितला ‘भेडिया’च्या दिग्दर्शकाबरोबरचा धमाल किस्सा

महेश भट्ट यांच्या चित्रपटात राहुल रॉय हा मुख्य भूमिकेत होता, आणि त्यालाही एका सिंहाने चावल्यामुळे इन्फेक्शन होतं आणि त्यामुळेच राहुल रॉय त्या चित्रपटात सिंहाचं रूप धारण करताना आपण पाहिलं आहे. वरुण धवनच्या या ‘भेडिया’चा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांना राहुल रॉयची आठवण झाली आहे. या चित्रपटातही तशीच काहीशी संकल्पना आपल्याला पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोन्ही चित्रपटाची तुलना करत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर हैदोस घातला आहे. याबद्दल बरेच मिम्सही शेअर केले गेले आहेत. याबरोबच अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान यानेही या २ चित्रपटांची तुलना करत वरुण धवन आणि ‘भेडिया’च्या मेकर्सवर टीका केली आहे. दिग्दर्शक अमर कौशिक यांचा हा तिसरा चित्रपट आहे. आता प्रेक्षक त्यांच्या या ‘भेडिया’साठी चांगलेच उत्सुक आहेत. हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. वरुण, क्रिती यांच्यासह दीपक डोबरियाल आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.