ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल दोन गट पडल्याचं दिसतंय. प्रभासच्या चाहत्यांनी चित्रपट ब्लॉकब्लस्टर असल्याचं म्हटलंय. पण, दुसरीकडे अनेकांना मात्र विविध कारणांनी हा चित्रपट फारसा आवडला नाही. त्यामुळे ते चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शकावर टीका करीत आहेत.

एकीकडे या चित्रपटाला जबरदस्त विरोध होत आहे तर दुसरीकडे या चित्रपटाने जगभरात १४० कोटींची रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली आहे. ओम राऊतच्या दिग्दर्शनावर लोकांनी चांगलीच टीका केली आहे. याबरोबरच प्रभासला प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत घेतलेलंही प्रेक्षकांना चांगलंच खटकलं आहे. प्रेक्षक सध्या या चित्रपटातील बारीक सारिक चुका सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आता लोकांनी आदिपुरुष अन् मार्वल कॉमिकच्या ‘थॉर’ या चित्रपटातील साम्य दाखवून दिलं आहे.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’मध्ये प्रभासला घेण्याबद्दल ओम राऊतचं स्पष्टीकरण; म्हणाला, “त्याचं मन निर्मळ…”

या दोन्ही चित्रपटांची तुलना करत नेटकऱ्यांनी ‘आदिपुरुष’मधले बरीच सीन्स ‘थॉर’मधून घेण्यात आल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे. रावणाची लंका आणि ‘थॉर’मधील एस्गार्ड नावाची जागा यांच्यातील बरेच साम्य लोकांनी दाखवले आहे. ‘आदिपुरुष’मधील शेवटचं युद्ध अन् ॲस्गार्डमधील शेवटचं युद्ध यातीलही बऱ्याच सारख्या गोष्टी लोकांनी फोटोसहित शेअर केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूणच ओम राऊतने केलेलं लंकेचं चित्रण अन ॲस्गार्डचं चित्रण हे खूपच सारखं असल्यामुळे लोकांनी त्यावर प्रचंड टीका केली आहे. रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ने तीन दिवसांत ३०० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात प्रभाससह क्रीती सेनॉन, सैफ अली खान अन् देवदत्त नागे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.