बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या बहुचर्चित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहरने तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा टीझर आलिया, रणवीर आणि करणने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, हा टीझर पाहून नेटकऱ्यांनी करण जोहरला चांगलेच ट्रोल केले आहे.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’च्या ट्रोलर्सला क्रिती सेनॉनने दिले सडेतोड उत्तर; पोस्ट शेअर करीत म्हणाली, “माझे लक्ष फक्त टाळ्यांचा आवाज अन्…”

१ मिनिट १९ सेकंदाच्या या टीझरमधील दुर्गा आरती, भव्य सेट, डान्स पाहून नेटकऱ्यांनी करण जोहरला ट्रोल करीत, “तुला नक्की काय दाखवायचंय?” असा प्रश्न विचारला आहे. एका युजरने लिहिले आहे की, “तू संजय लीला भन्साळी बनण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचे यामध्ये दिसत आहे, त्यांच्या चित्रपटातील सीन्सची सेम कॉपी केली आहेस.” तर दुसऱ्या एका युजरने “‘पद्मावत’, ‘कलंक’, ‘कुछ-कुछ होता है’, ‘रामलीला’, ‘कभी अलविदा ना कहना’ हे सगळे चित्रपट एकत्र करून तू हा चित्रपट बनवला आहेस याचा काय फायदा सगळे सीन सारखेच दिसत आहेत.” अशा प्रतिक्रिया देत करणला ट्रोल केले आहे.

हेही वाचा : “तुम क्या मिले…” रणवीर-आलियाचा रोमँटिक अंदाज, बहुचर्चित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटामध्ये एकही डायलॉग नसून पार्श्वभूमीला अरिजित सिंहचे “तुम क्या मिले…” हे सुंदर गाणे ऐकू येत आहे. बॅकग्राऊंडला गाणे सुरु असताना चित्रपटाच्या टीझरमधील प्रत्येक दृश्यात सस्पेन्स दाखवण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. “या चित्रपटातील बरेच सीन्स हे शाहरुख-काजोलच्या ९० च्या दशकातील चित्रपटांमधील वाटत आहेत”, “करण जोहर कधीच काही नवीन करू शकत नाही”, “रणवीर-आलियाला जबरदस्तीने शाहरुख-काजोल बनवण्याचा प्रकार सुरु आहे.” अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी हा टीझर पाहून दिल्या आहेत.

दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये रणवीर-आलियाशिवाय अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.