Actress Reacts To Trolling Over Personal Life Rumours : सोशल मीडियामुळे कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकदा बोललं जातं, चर्चा होते तर बऱ्याचदा त्यांना ट्रोलही केलं जातं. असंच काहीसं लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रीबरोबरही झालेलं. अशातच आता यावर तिने स्पष्ट वक्तव्य केलं आहे.

लोकप्रिय अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे. अशा लोकांनी इतरांबद्दल बोलण्यापेक्षा स्वत:च्या आयुष्यात काहीतरी काम करावं असंही म्हटलं आहे. ही बॉलीवूड अभिनेत्री म्हणजे निमरत कौर. निमरत कौरचं अभिनेता अभिषेक बच्चनसह नाव जोडण्यात आलेलं, यामुळे दोघांना सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलेलं.

निमरतने आता ट्रोलिंगविषयी तिची प्रतिक्रिया व्यक्त केली असून तिने ट्रोल करणाऱ्यांची दया येते असंही म्हटलं आहे. ‘न्यूज १८’शी संवाद साधताना निमरतने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. निमरत म्हणाली, “सोशल मीडियामुळे काहीही होऊ शकतं. पण, माझं आयुष्य मला कसं जगायचं आहे याबाबत स्पष्टता आहे. मुंबईत मी सोशल मीडियासाठी आले नव्हते. पूर्वी तर सोशल मीडियाच नव्हता. आपल्याकडे स्मार्टफोनही नव्हते.”

निमरत कौरची ट्रोलिंगबद्दल प्रतिक्रिया

ट्रोलिंगबद्दल बोलताना अभिनेत्री पुढे म्हणाली, “आयुष्यात मला काय करायचं आहे याबाबत पूर्ण कल्पना आहे. मला खूप काम करायचं आहे, प्रगती करायची आहे; त्यामुळे अशा निरर्थक गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. खरंच मला त्यांची दया येते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करायला हवं, वेळेचा सदुपयोग करायला हवा. मला त्यांच्याबद्दल व त्यांच्या कुटुंबीयांबद्दल खूप वाईट वाटतं.” पुढे अभिनेत्री ट्रोलर्सच्या जडणघडणीबद्दलही बोलली.

ट्रोल करणाऱ्यांबद्दल निमरत पुढे म्हणाली, “मला त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतं. जर रस्त्यावरील एक अनोळखी व्यक्ती तुम्हाला काही बोलली तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्याल का? स्पष्ट आहे की, ती व्यक्ती दुःखात आहे आणि तिला मदतीची गरज आहे. मला आयुष्यात खूप काही करायचं आहे, खूप लांबचा प्रवास आहे, माझ्याकडे अशा फालतू गोष्टींसाठी वेळ नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिषेक व निमरत यांनी ‘दसवी’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यामध्ये तिने अभिनेत्याच्या बायकोची भूमिका साकारली होती. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला. बॉक्स ऑफिसवर याला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, पण चित्रपट समीक्षकांनी या सिनेमाचं खूप कौतुक केलं होतं