आमिर खानचा जावई आणि सुप्रसिद्ध फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. बऱ्याचदा नुपूर सोशल मीडियावरील ट्रेंड्स फॉलो करून त्यावर रील बनवत असतो, अनेकदा त्याच्या रील्समध्ये त्याची आई प्रितम शिखरे यादेखील असतात. या माय-लेकांचे मजेदार रील्स चाहत्यांना खूप आवडतात.

नुपूरने आता असेच एक रील इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात नुपूरच्या काही कृती आणि त्यावर आईंचे टोमणे पाहायला मिळतात. मुलांनी काही म्हटलं की बऱ्याच आईंचे त्यावर टोमणे ठरलेले असतात, तसंच काहीसं या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. नुपूर व प्रितम शिखरे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून अनेक मराठी सेलिब्रिटींनी यावर कमेंट्सदेखील केल्या आहेत.

नुपूर शिखरेचं आईसह ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त रील; पत्नी आयरा खानची खास कमेंट, तर सुश्मिता सेनला हसू आवरेना

व्हिडीओत दिसतंय की प्रितम शिखरे बिस्किट खात असतात आणि तिथे नुपूर येतो, त्याला त्या ऑफर करतात. पण नुपूर ‘मी हे सगळं खात नाही’ असं म्हणत नकार देतो, त्यावर ‘तू फक्त मातीच खा’ असा टोला प्रितम शिखरे लगावतात. त्यानंतर नंतरच्या सीनमध्ये नुपूर पुशअप मारत असतो, तिथे प्रितम येतात आणि ‘पुशअप मारतोय, साधं बरणीचं झाकण उघडता येत नाही,’ असं म्हणतात. त्यानंतरच्या सीनमध्ये नुपूर धावून आल्याचं दिसतो. तिथे प्रितम येतात आणि म्हणतात ‘काय फायदा एवढं धावून, बाकीचे सगळे आयुष्यात पुढे गेले.’ शेवटच्या सीनमध्ये नुपूर हँडस्टँड करत असतो, तिथे प्रितम येतात आणि ‘आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका, नंतर करा हँडस्टँड’ असा टोला लगावतात.

शाहरुख खान मध्यरात्री कर्मचाऱ्याच्या झोपडपट्टीतील घरी जायचा, प्रसिद्ध कॉमेडियनचा दावा; म्हणाला, “मी तिथे भाड्याने…”

प्रितम व नुपूर यांनी हा मजेशीर व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये. फक्त चाहतेच नाही तर मराठी अभिनेत्रींनी यावर कमेंट्स केल्या आहेत. प्रिया बापटने हसणारे इमोजी व ‘आई गं’ अशी कमेंट केली आहे. तर अमृता खानविलकरने ‘आईच्या डायलॉगचा मीही रील बनवणार आहे’ अशी कमेंट केली आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. नशीब आईने १० वीचे मार्क्स नाही काढलेत, आई रॉक्स असं काहींनी लिहिलंय. तर काहींनी हसणारे इमोजी कमेंट केले आहेत.

अ‍ॅक्शन नाही अन् रोमान्सही नाही, १५ कोटींमध्ये बनलेल्या ‘या’ सिनेमाने कमावले १०२ कोटी, कुठे पाहता येणार? वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुपूरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तो आमिर खानचा जावई आहे. त्याने आयराशी ३ जानेवारी २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर १० जानेवारीला दोघांनी मित्र-मैत्रिणी व कुटुंबियांच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये लग्न केलं होतं. आयरादेखील पती व सासूचे हे मजेशीर व्हिडीओ पाहून भन्नाट कमेंट्स करत असते.