पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने ‘रईस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘रईस’मध्ये माहिरा शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला. चित्रपट रिलीज होऊन जवळपास ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात माहिरावर एक रोमँटिक गाणे जालिमा शूट करण्यात आले होते. अभिनेत्रीने या गाण्याच्या शूटिंगबाबत एक रंजक खुलासा केला आहे.

हेही वाचा- ‘किसी का भाई किसी की जान’च्या कमाईत सोमवारी मोठी घट; जाणून घ्या सलमानच्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन

माहिराने रईसच्या जालिमा गाण्याच्या शूटिंगशी संबंधित मजेशीर किस्से पॉडकास्टमध्ये शेअर केले आहेत. तिने सांगितले की, “हे एक रोमँटिक गाणे होते ज्यात मला शाहरुखसोबत रोमान्स करायचा होता, हॉट आणि सेक्सी दिसायचे होते. या गाण्याच्या शूटिंगच्या दिवशी मी खूप घाबरले होते. कारण मी पाकिस्तानची आहे आणि माझे स्वतःचे नियम होते. मला पडद्यावर चुंबन घ्यायचे नव्हते आणि कोणतेही उघड कपडे घालायचे नव्हते. शाहरुखनेही मला खूप सांभाळून घेतल्याचेही माहिरा म्हणाली.

अभिनेत्रीने सांगितले की, शाहरुख मला चित्रपटाच्या सेटवर खूप चिडवायचा. मला भीती वाटायची म्हणून सगळे हसायचे. मग मी त्यांना म्हणायचे की तुम्ही मला इथे स्पर्श करून मला इथे कीस करू शकत नाही. ‘पुढचा सीन काय आहे माहिती आहे का? असं म्हणत शाहरुख मला चिडवायचा असल्याचेही माहिराने सांगितले.

हेही वाचा- ७ कोटींचे दोन फ्लॅट बहिणीला गिफ्ट केल्यानंतर आलिया भट्टने स्वत:साठी मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत जाणून अवाक् व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खान आणि माहिरा खान स्टारर चित्रपट रईस पडद्यावर हिट ठरला होता. यामध्ये अभिनेत्रीने त्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया यांनी केले आहे. या चित्रपटात किंग खानने दारू तस्कराची भूमिका साकारली असून नवाजुद्दीन सिद्दीकीने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट हिट ठरला होता.