भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचं वृत्त व्हायरल झालं आहे. बिहारमधील कैमूर जिल्ह्यात रविवारी (२५ फेब्रुवारी) संध्याकाळी हा भीषण अपघात झाला. या अपघातात आंचलसह एकूण ९ जणांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये भोजपुरी इंडस्ट्रीमधील ४ नवोदित कलाकारांचा देखील समावेश होता. या घटनेमुळे संपूर्ण भोजपुरी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक, एसयुव्ही गाडी आणि मोटारसायकल यांच्या धडकेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील मोहनिया पोलीस स्टेशन हद्दीतील देवकाली गावाजवळ जीटी रोडवर ही घटना घडली. सोमवारी (२६ फेब्रुवारी) मृतांची ओळख पटली असून, यात भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारी, छोटू पांडे, सिमरन श्रीवास्तव, प्रकाश राम, दधिबल सिंग, अनु पांडे, शशी पांडे, सत्य प्रकाश मिश्रा आणि बागीश पांडे यांचा समावेश आहे.

हेही वाचा : “पुढील महाराष्ट्र भूषण”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाचा सुरेश वाडकरांना टोला; म्हणाले, “तुजं नमो गायक…”

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. एक्स पोस्ट शेअर करत त्यांनी घडल्या प्रकाराबद्दल दु:ख व्यक्त केलं असून जखमींवर वेळीच उपचार करण्याच्या सूचना आरोग्य प्रशासनाला दिल्या आहेत.

हेही वाचा : ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त प्रशांत दामलेंची मोठी घोषणा! मराठमोळ्या ‘तिकिटालय’ ॲपचा शुभारंभ, जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या भीषण अपघातानंतर भोजपुरी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त करत आहेत. सध्या बिहार पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.