Param Sundari Public Review: जान्हवी कपूर व सिद्धार्थ मल्होत्राचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘परम सुंदरी’ आज, २९ ऑगस्ट २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा दिल्लीतील मुलगा ‘परम’ आणि केरळच्या मुलीभोवती फिरते. दोघे प्रेमात पडतात. सिनेमात दक्षिण भारत आणि उत्तर भारताचा सांस्कृतिक फरक सुंदरपणे दाखवण्यात आला आहे. सिद्धार्थ आणि जान्हवीची ही नवी जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे आणि दोघांची केमिस्ट्री लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या चित्रपटात सोनू निगमने गायलेलं ‘परदेसिया’ हे गाणं रिलीज झाल्यापासूनच ट्रेंड करतंय. त्याचबरोबर सिद्धार्थ आणि जान्हवीच्या लूक आणि केमिस्ट्रीचीसुद्धा चर्चा होत आहे. श्रेया घोषाल व अदनान सामी यांनी गायलेले ‘भीगी साडी’ हे गाणंही प्रेक्षकांना भावला आहे. सिद्धार्थ व जान्हवी यांचा ‘परम सुंदरी’ चित्रपट कसा आहे? ते जाणून घेऊयात.
‘परम सुंदरी’ चित्रपट पहिल्याच दिवशी पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी एक्सवर पोस्ट केल्या आहेत. सिद्धार्थ व जान्हवीचा हा चित्रपट पाहावा की नाही, याबद्दल खुद्द प्रेक्षकांनीच रिव्ह्यू दिले आहेत. तुम्हीही हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर प्रेक्षकांचे एक्सवरील रिव्ह्यू नक्की वाचा.
पाहा प्रेक्षकांच्या पोस्ट
हा सिद्धार्थ व जान्हवीचा उत्तम चित्रपट आहे, असं एका युजरने म्हटलं आहे.

परम सुंदरीचा फर्स्ट हाफ पाहिला. पटकथा कमकुवत आहे. पटकथा खूप चांगली असू शकली असती. या चित्रपटाकडून जास्त अपेक्षा होत्या, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.
परमसुंदरी हा एक हलका-फुलका, रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर हा चित्रपट पाहून चांगला वेळ घालवू शकता. सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांनी खूप चांगला अभिनय केला आहे, अशी पोस्ट एका युजरने एक्सवर केली आहे.