परिणीती चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे, तिने आपल्या अभिनयाने या क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘सायना’, ‘हंसी तो फंसी’, अशा चित्रपटांतून तिने प्रेक्षकांच मनोरंजन केलं. आता परिणीतीने गायिका म्हणून संगीत क्षेत्रात पदार्पण केलंय. अभिनय क्षेत्रातून संगीत क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या परिणीतीचा नुकताच पहिला लाइव्ह परफॉर्मन्स मुंबईत झाला. सोशल मीडियावर या लाईव्ह परफॉर्मन्सचे व्हिडीओज आणि फोटोज व्हायरल होत आहेत.

परिणीतीने अभिनय सोडून आता संगीतक्षेत्रात उतरायचं ठरवलं आहे तेव्हापासूनच लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती. आता नुकताच तिचा पहिला लाईव्ह शो पार पडल्यावर लोकांची होणारी टीका ही दुपटीने वाढली आहे. लोकांनी तिच्या या गाण्याच्या निर्णयावर तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती ‘मै परेशान’ हे गाणं सादर करताना दिसत आहे, अन् यावेळी ती चांगलीच बेसुर झाल्याचंही प्रेक्षकांनाही ध्यानात आलं आहे.

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’ फेम संदीप रेड्डी वांगा यांचा पुढील चित्रपट सलमानबरोबर? नेमकं सत्य जाणून घ्या

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर लोकांनी कॉमेंट करत परिणीतीला गाणं थांबवण्याची विनंती केली आहे. एकाने कॉमेंटमध्ये लिहिलं, “मला तर त्या शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांबद्दल फार वाईट वाटतंय.” एकाने तर कॉमेंट करत आम आदमी पार्टीवरच निशाण साधला आहे. त्याने कॉमेंटमध्ये लिहिलं, “कृपया गाणं थांबव, नाहीतर आप हरेल.” तर एकाने परिणीतीला एक सल्ला दिला तो म्हणजे, “आपल्यातले सुप्त गुण हे कधीच जगासमोर आणू नयेत, ते गुलदस्त्यातच ठेवावेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्यांनी परिणीतीला चांगलंच ट्रोल केलं आहे. काहींनी तर तिची तुलना थेट राणू मंडलशीही केली आहे. लवकरच परिणीतीचा ‘चमकीला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दलजित दोसांझबरोबर परिणीती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याचं दिग्दर्शन इम्तियाज अली याने केलं असून ए.आर. रहमान यांनी याला संगीत दिलं आहे. पंजाबचे प्रसिद्ध संगीतकार अमर सिंह चमकीला यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला असून तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.