सुशांतसिंह राजपूत आणि परिणीती चोप्राचा ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपट सगळ्यांना आठवतच असेल. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने तरुणाईला वेड लावलं होतं. मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून परिणीती आणि सुशांतची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकली होती. नुकतचं या चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त परिणीतीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा- प्रियांकाप्रमाणेच परिणीती चोप्राही होणार उद्योजिका! अभिनेत्रीने केली मोठी घोषणा, टाकणार ‘या’ व्यवसायात पाऊल

परिणीतीने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटातील काही सीन्सचा बीटीएस व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत परिणीतीने लिहिलं आहे. वेळ किती लवकर निघून जाते. शुद्ध देसी रोमान्सला १० वर्ष पूर्ण झाली. मजा, बिझी शूट पण हळव्या क्षणांनी सिनेमाच्या आठवणी भरलेल्या आहेत. दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव छानच होता. ऋषी सर आम्ही तुम्हाला मिस करतो. सुशांत तुझी तर खूपच जास्त आठवण येते. माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी तू एक होतास.’

या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी कमेंट करत सुशांतची आठवण काढली आहे. एकाने कमेंट करत लिहिलं आहे “सुशांत तुझी खरंच खूप आठवण येते,’या सिनेमाचं एक वेगळंच आकर्षण होतं”. तर आणखी एकाने सुशांत खूप आठवतो’ अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा- पांढरा रंग, सोनेरी डिझाईन अन्…; परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढांच्या लग्नाच्या रिसेप्शनची तारीख ठरली? निमंत्रण पत्रिका समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणीतीबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. राघव आणि परिणीती यांचे लग्न २३ आणि २४ सप्टेंबरला होणार आहे. उदयपूर दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. सध्या दोघांचे कुटुंबीय लग्नाच्या तयारीला लागले आहेत.