scorecardresearch

शाहरुखला ओळखतच नव्हती ‘पठाण’ची अभिनेत्री, म्हणाली, “चित्रपटाच्या सेटवर कोणीतरी…”

पठाण चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत असलेल्या या अभिनेत्रीला शाहरुखला ओळखतही नव्हती

Rachel ann mullins, shahrukh khan, pathaan deepika padukone, rachel ann mullins pathaan actor, rachel ann mullins bollywood debut, pathaan, pathaan actor interview, bollywood, bollywood news, entertainment news, Entertainment News, शाहरुख खान, रेचल अॅन मुलिन्स, पठाण, दीपिका पदुकोण, पठाण बॉक्स ऑफिस कलेक्शन
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सोशल मीडियावर सध्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच गाजतोय. बॉलिवूडमध्ये एकामागोमाग एक चित्रपट फ्लॉप असताना शाहरुखच्या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोणही मुख्य भूमिकेत आहे. पण त्याचबरोबर हॉलिवूड अभिनेत्री रेचल अॅन मुलिन्सनेही शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली आहे. मात्र चित्रपटात काम करण्यापूर्वी तिला शाहरुख कोण आहे? हेच माहीत नव्हतं असा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

शाहरुख खानच्या ‘पठाण’मध्ये रेचलने रशियन गुप्तहेर एलिसची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाबाबत बोलताना रेचल म्हणाली, “मी जेव्हा या चित्रपटासाठी काम करायला सुरुवात केली तेव्हा मला काहीच माहिती नव्हती. एवढंच नाही तर चित्रपटचं नाव काय आहे हेही मला माहीत नव्हतं. जेव्हा मी यशराज स्टुडिओमध्ये शूटिंग करत होते तेव्हा एका कपाटावर दीपिका पदुकोणचं नाव पाहिलं होतं. मला माहीत होतं की हा बिग बजेट चित्रपट असणार आहे.”

आणखी वाचा- “भारतीय मुस्लीम देशभक्त आहेत” कंगना राणौतचं वक्तव्य; म्हणाली, “पठाण’ चित्रपटाचं नाव बदलून…”

रेचल पुढे म्हणाली, “माझा एजंट रवी आहूजाने मला या ऑडिशनबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी मी मालदीवला होते. मला त्यांचा फोन आल्यानंतर मी कॉस्ट्यूम फिटिंसाठी मुंबईला आले होत. पण चित्रपटात काम करायला सुरुवात करण्याआधी मला शाहरुखबद्दल काहीच माहीत नव्हतं. सेटवर कोणीतरी असिस्टंट डायरेक्टरने मला सांगितलं की शाहरुख खान खूप मोठा अभिनेता आहे. मी शाहरुखबरोबर शूटिंगचा वेळ एन्जॉय केला. विशेष म्हणजे शाहरुख आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी असतो.”

आणखी वाचा- ‘पठाण’ने काश्मीर खोऱ्यात रचला इतिहास; चाहते आभार मानत म्हणाले, “तब्बल ३२ वर्षांनी…”

दरम्यान शाहरुख खानच्या बहुचर्चित चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटर्सबाहेर तुफान गर्दी करत आहेत. चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी पाहता हा यंदाच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरेल, असे अंदाज वर्तवले जात आहेत. या चित्रपटात शाहरुख खानबरोबरच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 17:44 IST