शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा अधिकृत आकडा समोर आला आहे. आतापर्यंतच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ५२.५ कोटी रुपयांची कमाई केली होती. पण, अंतिम आकडेवारी आली नव्हती. चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी ‘पठाण’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची आकडेवारी जाहीर केली आहे.

‘पठाण’ने रचला इतिहास! चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; देशभरात ‘इतके’ शो वाढवले

कोमल नाहटा यांनी ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे. ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण ५७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. “हिंदी भाषेतील चित्रपटाने ५५ कोटी रुपये कमावले आहेत, तर डब केलेल्या चित्रपटाने २ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने एकूण ५७ कोटी रुपये कमावले आहेत. ही हिंदी चित्रपटासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे. सुट्टीचा दिवस नसतानाही सर्वाधिक इतकी मोठी कमाई करणारा ‘पठाण’ पहिला चित्रपट ठरला आहे. तसेच हा कोणत्याही चित्रपटाचा सिक्वेल नसून त्याने दमदार कमाई केली आहे,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘पठाण’ चित्रपट पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी आहे, त्यामुळे आज ‘पठाण’ १०० कोटी क्लबमध्ये सामील होऊ शकतो, असं म्हटलं जातंय. ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ५७ कोटी रुपयांची कमाई करत मोठा विक्रम रचला आहे.

२४० कोटींच्या बजेटमध्ये बनला ‘पठाण’! शाहरुखने १०० नव्हे तर घेतले ‘इतके’ कोटी, जाणून घ्या दीपिका-जॉनला किती मानधन मिळालं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खान गेली चार वर्षे मोठ्या पडद्यावरून दूर होता. त्याचा पुनरागमनाचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक होते. चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांची गर्दी होत आहे. ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खानसह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय सलमान खाननेही चित्रपटात कॅमिओ केला आहे.