‘चिकनी चमेली’, ‘शीला की जवानी’, ‘काला चष्मा’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री कतरिना कैफ सध्या चर्चेत आहे. गेली अनेक वर्ष ती बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. आपल्या करियरची सुरवात तिने मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे. तिचा बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी ‘फोन भूत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कतरिना कैफ भूताची भूमिका साकारताना दिसणार आहे. कतरिनाबरोबर या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कतरिनाने इटाईम्सला दिलेल्या मुलाखतीती भूतांबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिला या मुलाखतीत विचारण्यात आले की तिचा भुतांवर विश्वास आहे की नाही? तिने सांगितले हे कोणी नाकारू शकत नाही. तिने पुढे असे सांगितले की, जर तिने काहीतरी भयानक पाहिले तर ती रात्री झोपू शकत नाही. तिला वाईट स्वप्न पडतात. ‘फोन भूत’ हा केवळ एक हॉरर चित्रपट नाही तर एक हॉरर कॉमेडी आहे.

“मला डावलून त्याने… ” अक्षयने आमिर खानबाबत केला खुलासा

आतापर्यंत आपण कतरिनाला चित्रपटांमध्ये फक्त ग्लॅमरस भूमिकेत पाहिलं असून, कतरिना पहिल्यांदाच पडद्यावर भूताच्या भूमिकेत दिसणार आहे.
कतरिना मागच्या वर्षी आलेल्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात कुमारबरोबर झळकली होती. कतरिनाने याआधी ‘बँग बँग’, ‘धूम ३’, ‘टायगर जिंदा है’, ‘भारत’, ‘जब तक है जान’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि कतरिनाला पडद्यावर अशा अनोख्या भूमिकेत पाहणे ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असेल. ‘फोन भूत’ हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे, त्यामुळेदेखील रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रितेश सिधवानी, फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित ‘फोन भूत’ ४ नोव्हेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.