सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलीवूडमधील एक लोकप्रिय जोडपं आहे. ७ फेब्रुवारी रोजी ते विवाह बंधनात अडकले. त्यांचं लग्न अतिशय राजेशाही थाटात संपन्न झालं. तर लग्नानंतर अनेकदा ते फोटोग्राफर्सना एकत्र पोज देताना दिसतात. आता त्या दोघांचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

सिद्धार्थ आणि कियाराचा चाहतावर्ग प्रचंड खर्च आहे. त्या दोघांचं कामाबरोबरच ते दोघं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असतात. त्यांच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असलेले दिसतात. आता एका फोटोग्राफरने सर्वांसमोर सिद्धार्थ-कियाराला भैया-भाभी अशी हाक मारली. त्यावर कियाराने दिलेली प्रतिक्रिया आता व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’, अभिनेत्री कियारा आडवाणी झाली ट्रोल

सिद्धार्थ-कियारा यांचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघं विमानतळावरून मुंबईच्या बाहेर जाताना दिसत आहेत. त्या दोघांना विमानतळावर पाहून फोटोग्राफर्सने त्यांना फोटोसाठी पोज देण्याचे विनंती केली. तर ही विनंती करत असताना एकाने “भैया-भाभी इस तरफ देखो” असं म्हटलं. कोणीतरी आपल्याला ‘भाभी’ अशी हाक मारतंय हे पाहून कियारा लाजली आणि तिने हसत फोटोंना पोज दिल्या.

हेही वाचा : लग्नानंतर नवीन वास्तूत राहायला जाणार सिद्धार्थ-कियारा, घराची किंमत वाचून व्हाल आवाक्

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थ-कियाराचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर त्यांच्या चाहते प्रतिक्रिया देत कियाराचा हा क्युट अंदाज आवडल्याचं सांगत आहेत.