आपल्या बोल्ड लूक्समुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे हीचे निधन झाले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी सरव्हायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग)मुळे तिचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. पूनमच्या निधनामुळे बऱ्याच लोकांना धक्का बसला आहे. पूनम पांडेच्या टीमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅंडलवरुन तिच्या निधनाबद्दल माहिती कळवली.

पूनम पांडेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत तिच्या टीमने तिच्या फॉलोअर्सना ही बातमी दिली. तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून अद्याप याविषयी पूनमच्या कुटुंबियांनी या बातमीची पुष्टी केलेली नाही. पूनम ही सरव्हायकल कॅन्सरच्या चौथ्या स्टेजला होती अन् नुकतंच तिला या आजाराबद्दल समजलं होतं. पूनमच्या निधनाच्या बातमीवर कुणीच चटकन विश्वास ठेवत नाहीये, बरीच लोक या सगळ्याला एक पब्लिसिटी स्टंटदेखील म्हणत आहेत.

आणखी वाचा : बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेचं निधन; अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्ट व्हायरल

अशातच आता पूनमचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पूनमच्या शेवटच्या मुलाखतीमधला आहे. या व्हिडीओमध्ये पूनम प्रेक्षकांना लवकरच एक सरप्राइज देणार असल्याचं सांगताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात पूनम म्हणते, “लवकरच लोकांना माझ्याकडून एक मोठं सरप्राइज मिळणार आहे, लोकांना असं सरप्राइज करणं मला खूप आवडतं. खासकरून जेव्हा लोकांना वाटतं की ही सुधारली आहे तेव्हा मला त्याला सरप्राइज द्यायला जास्त आवडतं. एक मोठी बातमी तुमच्यासमोर लवकरच येणार आहे. मला तुमची प्रतिक्रिया पाहायला आवडेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूनमचा हा व्हिडीओ आता चर्चेत आला आहे. या व्हिडीओमुळे लोक पुन्हा पूनमच्या निधनाच्या बातमीवर प्रश्नचिन्ह उभं करत आहेत. कित्येकांना तर पूनमच्या निधनाची बातमी अजूनही खोटीच वाटत आहे अन् तसं त्यांनी कॉमेंटमध्ये लिहिलंदेखील आहे. मनोरंजनसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पूनमला श्रद्धांजली वाहिली आहे.