scorecardresearch

प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालचा अपघात; मुंबईच्या रुग्णालयात केलं दाखल

त्याच्या चाहत्यांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे

प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालचा अपघात; मुंबईच्या रुग्णालयात केलं दाखल
गायक जुबिन नौटियाल

लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल याचा गुरुवारी पहाटे अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. जुबिनला नुकतेच मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इमारतीच्या जिन्यांवरून पडल्याने त्याच्या कोपराला आणि आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. डोक्याची दुखापत किरकोळ असली तरी याबरोबरच त्याच्या बरगड्यांनाही जबर मार लागल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘तू सामना आये’, ‘माणिके’, ‘बना शराबी’ आशा ट्रेंडिंग गाण्यांमुळे जुबिन चांगलाच चर्चेत आहे. मीडिया रीपोर्टनुसार गुरुवारी रात्री जुबिनच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी त्याला उजव्या हाताचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.

आणखी वाचा : आई कोमात असताना परेश रावल यांना डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला; आठवण सांगताना अभिनेता भावूक

शुक्रवारी सकाळी, जुबीन पुढील उपचारांसाठी त्याच्या मूळ गावी, उत्तराखंडला रवाना होत असताना विमानतळावर दिसला. त्याच्या चाहत्यांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावरही त्याचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. गेल्या आठवड्यात जुबीनने कर्जत येथे योहानीबरोबरच्या ‘तू सामने आये’ हे नवीन गाणे लॉंच केले होते.

जुबिनने ‘रातां लांबियां’, ‘लुट गए’, आणि ‘तुझे कितने चाहने लगे हम, तुम यासारख्या यासारखी कित्येक सुपरहीट गाणी दिली आहेत. आज त्याने या सुपरहीट गाण्यांच्या माध्यमातून भारतीय संगीत विश्वात स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. मध्यंतरी एका वादग्रस्त प्रकरणामुळे जुबिनला अटक करायची मागणीदेखील झाली होती, तेव्हा तो चांगलाच चर्चेत आला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 14:34 IST

संबंधित बातम्या