Prajakta Koli Dance On Sanju Rathod’s Shaky Song : बॉलीवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राजक्ता कोळीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. युट्यूबवर ती ‘मोस्टलीसेन’ नावाने प्रसिद्ध आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्या सर्वत्र ‘शेकी’ गाण्याचा ट्रेंड सुरू आहे. या व्हायरल गाण्यावर प्राजक्ता कधी डान्स करणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर अभिनेत्री संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
संजू राठोडचं ‘शेकी’ गाणं एप्रिल महिन्यात सर्वांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याने महिन्याभरातच संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला. सामान्य नेटकऱ्यांपासून ते मोठमोठ्या बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाला या गाण्याची भुरळ पडली. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकार सुद्धा या गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळालं. आता ‘मोस्टलीसेन’ प्राजक्ता कोळीने या ‘शेकी’ साँगवर भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.
प्राजक्ता कोळीच्या डान्स व्हिडीओवर संजू राठोडची खास कमेंट
प्राजक्ता कोळी ‘शेकी’ गाण्याच्या ओळींप्रमाणे सुरुवातीला तिची नोजपिन आणि कानातले फ्लॉन्ट करते आणि त्यानंतर आयलॅशेस सुद्धा ब्लिंक करून दाखवते. यानंतर अभिनेत्रीने प्रसिद्ध कोरिओग्राफर हिमांशू दुलानीबरोबर ‘शेकी’ गाण्यावर सुंदर असा डान्स केला आहे.
प्राजक्ता कोळीचा डान्स पाहून संजू राठोडने ‘एक नंबर’ अशी कमेंट केली आहे. संजूसह लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर समीक्षा टक्केने देखील ‘लव्ह इमोजी’ शेअर करत प्राजक्ताच्या डान्सचं कौतुक केलं आहे.
तर, अन्य नेटकऱ्यांनी “आमची OG मराठी मुलगी”, “प्राजक्ता एकदम परफेक्ट वाटतेय”, “आम्ही कधीपासून या रील व्हिडीओची वाट पाहात होतो”, “मोस्टलीसेन स्टोल द शो…या शेकी ट्रेंडची विनर आहेस तू प्राजू”, “तुला शंभर पैकी शंभर मार्क्स”, “एकदम सुंदर डान्स” अशा भन्नाट कमेंट्स या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, ‘शेकी’ गाणं स्वत: संजू राठोडने गायलं असून या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. या गाण्यात अभिनेत्री ईशा मालवीय प्रमुख भूमिकेत झळकली आहे.