प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते प्रकाश झा यांनी अभिनेत्री दीप्ती नवलशी लग्न केलं होतं. त्यांनी १९८५ मध्ये लग्नगाठ बांधली होती, पण २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दीप्ती नवल यांचा आठव्या महिन्यात गर्भपात झाला होता. त्या प्रसंगानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जातं. दोघेही १७ वर्षांनी विभक्त झाले. पण प्रकाश झा यांना एक मुलगी आहे. तिचं नाव दिशा आहे.

दिशा ही प्रकाश झा यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे. प्रकाश यांची आधीपासून मुलगी दत्तक घ्यायची इच्छा होती. त्यांनी आणि दीप्ती दोघांनी १९९१ मध्ये दिशाला दत्तक घेतलं होतं. प्रकाश झा यांनी दिशाला दत्तक घेण्याबद्दल सांगितलं होतं. १९८८ मध्ये त्यांना दिल्लीतील अनाथाश्रमातून एक फोन आला होता. एक १० महिन्यांची मुलगी एका सिनेमा हॉलमध्ये सीटखाली सापडल्याची माहिती त्यांना फोनवर कळाली. मुलीला संसर्ग झाला होता आणि तिच्या संपूर्ण शरीराला उंदराने कुरतडलं होतं आणि तिला किडे चावले होते. प्रकाश झा यांनी तातडीने त्या मुलीला घरी आणून तिची काळजी घेतली. मुलगी काही दिवसांतच बरी झाली. त्यानंतर प्रकाश झा यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून तिला दत्तक घेतलं आणि तिचं नाव दिशा ठेवलं.

प्रकाश झा दिल्लीत तर मुंबईत राहायच्या दीप्ती नवल

एकीकडे प्रकाश झा यांच्या लेकीच्या येण्याने आनंद झाला, तर दुसरीकडे पत्नीशी घटस्फोट झाला. घटस्फोटाआधी प्रकाश झा दिल्लीत आणि दीप्ती नवल मुंबईत शूटिंगमुळे होते. अशा परिस्थितीत प्रकाश झा यांनी एकट्यांनीच मुलीला एक वर्ष वाढवलं. ते स्वत: तिला आंघोळ घालायचे, खाऊ घालायचे आणि कामावरही बरोबर न्यायचे. मुलगी एक वर्षाची झाल्यावर प्रकाश झा यांनी चित्रपट सोडून पाटण्याला जाण्याचा निर्णय घेतला. पाटण्यात आल्यानंतर प्रकाश झा यांनी एनजीओची स्थापना केली. इथं प्रकाश झा यांनी मुलीला त्यांच्या आईबरोबर ठेवलं.

चार वर्षांनी त्यांच्या आईचं निधन झालं. तेव्हा प्रकाश झा यांच्याकडे काम नव्हतं. ते फक्त एनजीओचे काम पाहत होते. त्यामुळे त्यांनी दिशा सांभाळलं व काही वर्षांनी ते मुंबईला परतले आणि तिथे त्यांनी दिशाचं एका शाळेत अॅडमिशन केलं. त्यांची लेक आता मोठी झाली आहे. दिशाने आता चित्रपट निर्माती आहे.

२०१९ मध्ये, दिशाने प्रकाश झा यांच्याबरोबर ‘फ्रॉड सैयां’ चित्रपटाची निर्मिती केली होती. दिशाचं ‘पॅन पेपर्स सीझर एंटरटेनमेंट’ नावाचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे.