बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. सध्या ती गरोदरपण एन्जॉय करतेय. अनेकदा ती रणबीर कपूरसह स्पॉट होते. काही दिवसांपूर्वीच आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी सासू नीतू कपूरसह तिचं असलेलं बॉन्डिंग पाहायला मिळालं होतं. आता आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ सोशल माडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात नीतू कपूर यांची आलियासाठीची काळजी दिसून येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये डिनरनंतर आलिया भट्ट, नीतू कपूर आणि रणबीर कपूर रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. तिघंही रेस्टॉरंटमधून बाहेर पडून कॅमेराच्या दिशेने येत असतात आणि त्यावेळी नीतू कपूर आपल्या मुलाचा हात पकडून चालत असलेल्या दिसत आहेत. जसं ते तिघंही पायऱ्यांजवळ येतात आणि आलिया एकटीच पायऱ्या उतरत असते. तेव्हा नीतू कपूर लगेचच अलर्ट होतात आणि रणबीरला इशारा करतात.

आणखी वाचा- गरोदरपणाच्या सातव्या महिन्यामध्ये आलिया भट्ट रणबीर कपूरसाठी उपवास करणार, कारण…

या व्हिडीओमध्ये नीतू कपूर रणबीरला इशारा करून आलियाचा हात पकडून तिला मदत करण्यास सांगतात. आईचं बोलणं ऐकून रणबीर लगेचच आलियाला आधार देण्यासाठी पुढे होतो. तो तिचा हात पकडतो जेणेकरून पायऱ्या उतरताना तिला काही त्रास होऊ नये. पण आलिया आपण ठीक असल्याचं सांगत हळूहळू पायऱ्या उतरताना दिसते. आलिया-रणबीरचा या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

आणखी वाचा- ‘चला हवा येऊ द्या’मध्ये स्वप्निल जोशीचं हसणं स्क्रिप्टेड असतं का? निलेश साबळे म्हणतात, “तुम्ही या आणि…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट करताना नीतू कपूर आणि रणबीर यांचं कौतुक केलं आहे. तर काही मात्र नीतू कपूर यांना ट्रोल करताना दिसत आहेत. काही युजर्स तर नीतू कपूर यांना पजेसीव्ह म्हणताना दिसत आहेत. युजर्सचं म्हणणं आहे की, जेव्हा रणबीर सुरुवातीला आलियाचा हात पकडत होता तेव्हा नीतू यांनी त्याला तिचा हात पकडू दिला नाही त्या स्वतः त्याचा हात पकडून चालू लागल्या आणि कॅमेरासमोर आल्यावर त्या काळजी दाखवत आहेत. दरम्यान या सगळ्यात काही चाहत्यांमध्ये यावरून भांडणही झाल्याचं दिसत आहे.