अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आम आदमी पार्टी’चे नेते राघव चड्ढा यांनी उदयपूरमध्ये रविवारी (२४ सप्टेंबर रोजी) लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. परिणीती व राघव यांनी लग्नातील काही खास क्षण त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Photos: भरजरी लेहेंगा, ओढणीवर राघवरावांचं नाव अन्…; परिणीती चोप्राच्या लग्नातील फोटोंनी वेधलं लक्ष

परिणीती व राघव यांच्या लग्नाला तिची बहीण प्रियांका चोप्रा उपस्थित राहू शकली नाही, पण परिणीने फोटो शेअर करताच प्रियांकाने कमेंट केली आहे. तिच्या कमेंट आणि इमोजीवरून तिला बहिणीच्या लग्नात उपस्थित राहू न शकल्याची खंत होती. तिने कमेंट करत “माझे आशीर्वाद कायम तुमच्याबरोबर असतील” असं म्हटलं. यासोबतच तिने काही इमोजी पोस्ट केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
priyanka chopra comment on parineeti raghav photos
प्रियांका चोप्राची कमेंट

दरम्यान, राघव व परिणीती यांनी मे महिन्यात साखपुडा केला होता. तेव्हापासून दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. दोघांच्या लग्नात त्यांच्या कुटुंबियांसह बॉलीवूडमधील काही कलाकारांनी हजेरी लावली. या लग्नात परिणीतीची खास मैत्रीण सानिया मिर्झा, डिझायनर मनीष मल्होत्रा यांनीही हजेरी लावली होती.