बॉलिवूडची देसी गर्ल आता ग्लोबल स्टार झाली आहे. फक्त भारतात नाही तर जगभरात तिने चांगलं नाव कमावलं आहे. प्रियांका चोप्रा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. लग्नानंतर प्रियांका चोप्रा पती निक जोनससह अमेरिकेत राहते. काही महिन्यांपूर्वीच प्रियांकाने सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीला जन्म दिला. मात्र प्रियांकाच्या मुलीचा चेहरा अद्याप कोणीही पाहिलेला नाही. आता प्रियांका चोप्रा भारतात परताणार आहे. प्रियांकाने याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली.

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने तीन वर्षांनंतर भारतात परतत असल्याचं म्हटलं आहे. प्रियांका चोप्रा यावेळी भारतात एकटी येत नाहीये तर तिच्याबरोबर तिची लाडकी लेक मालतीही भारतात येणार आहे. ही माहिती शेअर करताना प्रियांका चोप्रा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

आणखी वाचा- “वयाने लहान अभिनेत्याबरोबर…” लग्नानंतर ऐश्वार्या रायच्या बोल्ड सीनमुळे बच्चन कुटुंब होतं नाराज

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रियांकाने युएस- मुंबई फ्लाइटच्या बोर्डिंग पासचा फोटो शेअर केला आहे. प्रियांकाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “परदेशात राहिल्यानंतर अखेर तीन वर्षांनंतर मायदेशी घरी परतण्याची जाणीव खूप भारी असते.” प्रियांका चोप्राच्या या भारत भेटीदरम्यान तिची मुलगी मालतीही तिच्याबरोबर असणार आहे. करोनानंतर प्रियांका पहिल्यांदाच भारतात परतणार आहे त्यामुळे तिची ही ट्रीप खास आहे.

आणखी वाचा- जावई असावा तर असा! सासूबाईंची काळजी घेणाऱ्या निक जोनसची सोशल मीडियावर चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Priyanka Chopra instagram

दरम्यान प्रियांका चोप्रा काही वर्षे अमेरिकेत राहिली आहे. भारतात शिक्षण झाल्यानंतर १२ व्या वर्षी प्रियांका अमेरिकेत गेली होती. मात्र काही वर्षांनी ती पुन्हा भारतात परतली आणि बॉलिवूडमध्ये आपलं करिअर उभं केलं. भारतीय चित्रपटसृष्टीत चांगलं नाव कमावल्यानंतर तिने २०१५ मध्ये ‘क्वांटिको’मधून तिने हॉलिवूड पदार्पण केलं आहे. २०१८ मध्ये तिने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केलं. ज्यानंतर ती कायमची अमेरिकेत स्थायिक झाली आहे.