अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनास आणि मुलीसह लॉस एंजेलिसमध्ये राहते. पण तिला तिचं आलिशान घर सोडावं लागलं आहे. हे घर आता राहण्यायोग्य नाही. घरात पाणी गळतीमुळे बुरशी लागली आहे. बुरशी आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे घराची दुरुस्ती होईपर्यंत त्यांनी हे घर सोडलं आहे. हे जोडपं आता घराच्या जुन्या मालकाविरोधात कायदेशीर लढाई लढत असल्याचं म्हटलं जात आहे.

पेज सिक्सच्या वृत्तानुसार, घरात ज्या काही समस्या आहेत, त्या आरोग्याच्या दृष्टिने चांगल्या नाहीत. प्रियांका आणि निक यांनी पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये हे आलिशान घर २० मिलियन डॉलर्समध्ये खरेदी केले होते. या घरामध्ये सात बेडरूम, नऊ बाथरूम, टेम्प्रेचर कंट्रोल वाइन सेलर, किचन, होम थिएटर, बॉलिंग ॲली, स्पा आणि स्टीम शॉवर, जिम आणि एक बिलियर्ड्स रूम आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याने केलं अरेंज मॅरेज, सात वर्षांनी लहान आहे पत्नी, लग्नाचे फोटो आले समोर

मे २०२३ मध्ये प्रियांका व निकने कायदेशीर खटला दाखल केलाय, असं म्हटलं जात आहे. अहवालानुसार, घर खरेदी केल्यानंतर काही दिवसांतच पूल आणि स्पामध्ये समस्या दिसू लागल्या होत्या. वॉटरप्रूफिंग नसल्यामुळे घराच्या अनेक भागात बुरशी वाढू लागली, तसंच बारबेक्यूमध्येही पाणी गळत होतं, असं तक्रारीत म्हटलं आहे.

ट्रकभर फुलांचा वर्षाव करूनही श्रीदेवींनी अमिताभ बच्चन यांच्यासह काम करण्यास दिलेला नकार; ठेवली होती ‘ही’ अट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांना त्यांच्या नुकसान भरपाई हवी आहे. या घराच्या दुरुस्तीसाठी जोनास दाम्पत्याने केलेला खर्च त्यांना घराच्या जुन्या मालकाकडून पाहिजे आहे. घराच्या दुरुस्तीत आतापर्यंत १५ मिलियन डॉलर्सहून अधिक खर्च झाला आहे. या घराची दुरुस्ती होईपर्यंत प्रियांका व निक आपल्या मुलीसह दुसरीकडे राहतील.