देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्या बहिणींची नेहमी चर्चा रंगलेली असते. सध्या 'बिग बॉस १७'मुळे मनारा चोप्रा चर्चेत आहे. तसंच दुसऱ्या बाजूला परिणीती चोप्राने संगीत क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे चर्चा रंगली आहे. अशातच आता प्रियांकाची आणखी बहीण चर्चेत आली आहे. कारण आहे तिच लग्न. २४ सप्टेंबर २०२३ रोजी अभिनेत्री परिणीती चोप्रा मिसेज चड्ढा झाली. तिने आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. आता पुन्हा चोप्रा कुटुंबात सनई-चौघडे वाजणार आहेत. प्रियांका, परिणीतीची बहीण मीरा चोप्रा मार्चमध्ये लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे. याचा खुलासा तिने स्वतः केला आहे. हेही वाचा - Video: चाहत्यांच्या धक्काबुक्कीमुळे पडला Bigg Boss 17 विजेता मुनव्वर फारुकी, व्हिडीओ व्हायरल 'इस्टंट बॉलीवूड' या एंटरटेनमेंट चॅनलशी बोलताना मीरा म्हणाली, "मी लग्न करणार आहे. सध्या लग्नाची तयारी सुरू आहे. मार्चमध्ये लग्न आहे. लग्नाचं ठिकाण ठरलं आहे. राजस्थानमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न होणार आहे." त्यानंतर होणाऱ्या नवऱ्याबाबत विचारलं असता मीराने ते गुलदस्त्यात ठेवलं. पुढे मीराने म्हणाली, "लग्नासाठी प्रियांका व निक जोनस यांना आमंत्रण दिलं जाईल. जर ते कोणत्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त नसतील तर ते नक्की येतील." दरम्यान, मीराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'सेक्शन ३७५', 'सफेद' यांसारख्या चित्रपटात तिने काम केलं आहे. मीराने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. ती 'मरुधामलाई', 'अन्बे आरुयीरे' यांसारख्या चित्रपटात झळकली आहे.