फरहान अख्तरने ‘डॉन ३’ची घोषणा केल्यानंतर सगळेच फार उत्सुक झाले होते. चाहत्यांची ही उत्सुकता मात्र एका क्षणात रागात बदलली जेव्हा या तिसऱ्या भागात मुख्य भूमिकेसाठी रणवीर सिंहला घेतल्याचं स्पष्ट झालं. प्रेक्षकांना या भूमिकेसाठी रणवीरची निवड अजिबात पटलेली नसून त्यांनी यावर टीकादेखील केली. आता या चित्रपटाशी निगडीत एक नवी अपडेट समोर येत आहे. ‘डॉन’ची जंगली बिल्ली म्हणजेच प्रियांका चोप्रा या तिसऱ्या चित्रपटाशी जोडली जाणार असल्याची शक्यता आहे.

‘कोईमोई’च्या रिपोर्टनुसार, ‘जी ले जरा’ या चित्रपटाच्या कलाकारांची निवड अद्याप झाली नसल्यामुळे, फरहान अख्तर ‘डॉन ३’कडे प्रथम लक्ष देणार असल्याचं समोर आलं आहे. लवकरच प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंगबरोबर फरहान ‘डॉन ३’ च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. रिपोर्टनुसार, प्रियांकाने नुकतीच फरहान अख्तरची भेट घेतली असून त्यांनी ‘डॉन ३’विषयी काही गोष्टींवर चर्चाही केली आहे.

आणखी वाचा : अभिनय सोडणं, आमिर खानकडून मार्गदर्शन याबद्दल दर्शिल सफारीचं वक्तव्य; म्हणाला, “लोकांचा गैरमसज…”

याआधीच्या दोन्ही डॉनमध्ये प्रियांका रोमाच्या भूमिकेत दिसली होती. ‘डॉन ३’ साठी याआधी क्रीती सेनॉन व कियाराय आडवाणी यांनाही विचारण्यात आलं होतं. परंतु या दोघींनीही ही ऑफर नाकारल्याने अखेर फरहानने प्रियांकालाच घ्यायचं ठरवलं. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नसली तरी प्रियांका या चित्रपटात झळकणार हे नक्की झालं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांका चोप्राने यापूर्वी रणवीर सिंगबरोबर ‘गुंडे’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात काम केले होते. दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर रणवीर सिंग सध्या ‘सिंघम अगेन’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे, तर प्रियांका चोप्रा तिच्या काही आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचे काम पूर्ण करून ‘डॉन ३’साठी वेळ काढू शकते. प्रियांका ‘सिटाडेल २’ मध्येही झळकणार आहे.