बॉलीवूड अभिनेत्री म्हणून करिअर सुरू केल्यानंतर आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा ग्लोबल स्टार बनलेली आहे. ती सध्या तिचा पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनससोबत भारतात आली आहे. गेले काही दिवस ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने बॉलीवूडमधील तिच्या करिअरबद्दल एक धक्कादायक विधान केले होते. त्यानंतर आता तिची आई मधू चोप्रा यांनीही प्रियांकाच्या बॉलिवूड करिअरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रियांका म्हणाली होती, “मला बॉलीवूडमध्ये जे काम मिळत होतं, त्यात मी खूश नव्हते. इथे मला कॉर्नर केलं जात होतं. मला चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं. मला खूप जणांकडून तक्रारी होत्या. मला गेम खेळता येत नाही. इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते. मला ब्रेक हवा होता आणि म्हणून मी बॉलीवूडपासून दूर जाऊन हॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली.” तर आता तिच्या आईनेही एक मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रियांकाला अनेक चित्रपट गमवावे लागले, असा खुलासा त्यांनी केला.

आणखी वाचा : शेफ होत प्रियांका चोप्राने पहिल्यांदाच घडवली तिच्या ‘सोना’ रेस्टॉरंटच्या किचनची सफर, व्हिडिओ व्हायरल

मधू चोप्रा यांनी नुकतीच ‘जोश टॉक्स विथ आशा’मध्ये सुप्रिया पॉल यांना मुलाखत दिली. त्या वेळी मधू चोप्रा लेकीच्या संघर्षाबद्दल मोकळेपणाने बोलल्या. त्या म्हणाल्या, “प्रियांका आणि मी दोघीही चित्रपट आणि ग्लॅमर इंडस्ट्रीत नवीन होतो. तर हे एखाद्या आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवण्यासारखं होतं. प्रियांकाने तिच्या बॉलीवूड करिअरमध्ये काही प्रोजेक्ट्स गमावले होते, कारण तिने काही सीन करण्यास नकार दिला होता, जे करण्याच्या लायकीचे नव्हते.” आता त्यांचे हे बोलणे खूप चर्चेत आले आहे.

हेही वाचा : …आणि प्रियांका चोप्राने भर कार्यक्रमात सेटजवरच निक जोनसला केलं किस, व्हिडीओ तुफान व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. लवकरच ही सीरिज प्रदर्शित होणार असून या सीरिजमध्ये प्रियांका महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. तर याचबरोबर ती या वर्षी झोया अख्तर निर्मित ‘जी ले जरा’ या बॉलीवूड चित्रपटातही दिसेल.