अभिनेत्री राधिका आपटे तिच्या भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असते. तिचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट मागच्या महिन्यामध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान प्रमुख भूमिकेत आहे. तिने चित्रपटामध्ये सैफच्या पत्नीचे पात्र साकारले आहे. याआधी ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमध्ये त्यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सध्या सुरु आहे. ‘विक्रम वेधा’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी राधिका खास लंडनहून भारतात आली होती. गेल्या काही महिन्यापासून ती इंग्लंडमध्ये राहत आहे. तिने २०१२ मध्ये बेनेडिक्ट टेलर या ब्रिटीश संगीतकाराशी लग्न केले. लग्नानंतर लगेच तिने चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी भारतामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. २०१२ ते २०२० यामध्ये ते दोघे एकमेकांपासून लांब राहत होते. करोना काळात ती पुन्हा इंग्लंडला परतली. तेव्हापासून राधिका तिच्या नवऱ्यासह तेथे वास्तव्याला आहे. ‘विक्रम वेधा’च्या प्रमोशनल कार्यक्रमामध्ये तिने या गोष्टीबद्दल खुलासा केला. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “२०१२ पासून आम्ही एकमेकांपासून लांब होतो. करोना काळात आम्हांला एकत्र राहायची संधी मिळाली. या कालावधीत आम्ही आमच्या नात्याची पुन्हा नव्याने सुरुवात केली”

आणखी वाचा – “माझ्या वयामुळे…” बॉलिवूडमध्ये काम न मिळाल्याबद्दल सुश्मिता सेनने केला होता खुलासा

ती पुढे म्हणाली, “मी त्याला (बेनेडिक्ट) सोडून जेव्हा पहिल्यांदा भारतात आले, तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं. आता पुन्हा कामामुळे मला त्याला सोडून जावे लागणार आहे आणि या विचारानेच मला फार दु:ख होतंय. काम सांभाळून जास्तीत जास्त वेळ एकत्र राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आपला जवळचा व्यक्ती सोबत नसणं त्रासदायक असतं. पण जर तुम्ही ठरवलं, तर ही परिस्थितीही सांभाळू शकता. एकत्र असताना आपल्या जोडीदाराला स्वातंत्र्य देणं गरजेच असतं. जेव्हा तुम्ही स्वत:ला ओळखायला लागता, तेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला समजून घेता येतं. यानेच नातं टिकून राहतं”

आणखी वाचा – “खूप शांतता…” ऋषी कपूर यांच्या आठवणीत नितू कपूर भावूक, पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जून महिन्यामध्ये तिचा ‘फॉरेन्सिक’ हा चित्रपट झी ५ वर प्रदर्शित झाला होता. ‘विक्रम वेधा’ आणि ‘फॉरेन्सिक’ या दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दाखवली आहे. वर्षाच्या शेवटी तिचा मोनिका ‘ओ माय डार्लिंग’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.