Raha Kapoor Cute Video : आलिया भट्ट व रणबीर कपूर या दोघांपेक्षा सध्या त्यांची गोंडस लेक राहाची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा रंगलेली असते. अवघ्या दीड वर्षांच्या राहाचे गोंडस हावभाव, तिचं निर्मळ हास्य पाहून सर्वांनाच तिची भुरळ पडली आहे. राहा कपूर नेटकऱ्यांसह बॉलीवूडमधल्या इतर स्टार्सची सुद्धा खूपच लाडकी आहे. अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात राहा तिचे आई-बाबा आलिया व रणबीरसह सहभागी झाली होती. यावेळी जवळपास प्रत्येक सेलिब्रिटीने राहाची विचारपूस केल्याचं व्हायरल व्हिडीओंमध्ये पाहायला मिळालं होतं.

राहा कपूरचा ( Raha Kapoor ) जन्म ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. तिच्या जन्मानंतर आलियाने जवळपास ४-५ महिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. राहा थोडीशी मोठी झाल्यावर अभिनेत्री पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागली. राहाचा जन्म झाल्यावर रणबीर – आलियाने जवळपास वर्षभर लेकीचा चेहरा कोणत्याही फोटोमध्ये रिव्हिल केला नव्हता. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या दिवशी आलिया, रणबीर व राहा या कपूर कुटुंबीयांनी पापाराझींसमोर एकत्र पोज दिल्या… याचवेळी राहा पहिल्यांदा माध्यमांसमोर आली होती.

हेही वाचा : मिसेस कपूर होण्याआधी आलियाने सोडलेली ‘ती’ सवय; रणबीर कपूरने बायकोबद्दल केला खुलासा; म्हणाला, “वयाची ३० वर्षे…”

राहाचा चेहरा रिव्हिल होताच इंटरनेटवर सर्वत्र तिचे फोटो – व्हिडीओ व्हायरल झाले होते. सर्व स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. आता हळुहळू रणबीर-आलियाची ही लाडकी लेक मोठी होत आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया लेकीला कडेवर घेऊन नव्या घराची पाहणी करण्यासाठी गेली होती. मात्र, आता राहा व्यवस्थित चालू लागली आहे. कपूर कुटुंबीयांच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेरचा राहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘विरल भय्यानी’ या पापाराझी पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

राहा कपूरच्या गोड अंदाजाने वेधलं लक्ष ( Raha Kapoor )

राहा कपूर ( Raha Kapoor ) या व्हिडीओमध्ये कॅमेऱ्यांकडे व पापाराझींना पाहून खुदकन हसत असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर रणबीर येताच बाबाचा हात पकडून राहाने पहिल्यांदाच पापाराझींसमोर गोड पोज दिल्या. थोडं पुढे जाताच रणबीरने पुन्हा एकदा लेकीला कडेवर उचलून घेतल्याचं पाहायला मिळालं. राहा यामध्ये अगदी गोड दिसत असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

raha kapoor
रणबीर कपूर व राहा कपूर ( Raha Kapoor ) फोटो सौजन्य : विरल भय्यानी

हेही वाचा : Bigg Boss Marathi : प्रतीक्षा संपली! अखेर बिग बॉस’च्या घराची पहिली झलक आली प्रेक्षकांसमोर… पाहा Inside व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राहा किती लवकर मोठी झाली…आता तिला चालता येतं”, “आता राहा एकदम आलियासारखी दिसतेय”, “किती गोड हसतेय”, “सेम टू सेम आलिया”, “खरंच राहा खूपच गोड आहे” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.