Bheed trailer : करोनामुळे देशभरात अचानक जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. देशात अंतर्गत सीमा आखल्या गेल्या. अन्न- वस्त्र, निवारा, वाहतुकीची साधने अशा कोणत्याही मूलभूत सुविधा नाकारली गेलेली अनेक माणसे या काळात परागंदा झाली. अनेकांचे रोजगार गेले. लाखों लोकांनी आपआपल्या घरी परतण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले. लॉकडाउनच्या काळातील हे भयाण वास्तव आता ‘भीड’ या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘आर्टिकल १५’, ‘अनेक’, ‘मुल्क’, ‘थप्पड’ अशा वेगळ्या धाटणीचे, रोखठोक वास्तव आशय-विषयाची मांडणी असलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ‘भीड’चे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरची सुरुवात देशाचे प्रधानमंत्री यांनी केलेल्या लॉकडाउनच्या घोषणेपासून होते आणि हळूहळू या कथानकाची दाहकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.

२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
elon musk postpones trip to india
‘टेस्ला’चे मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर; वर्षअखेरीस भेटीचे सुतोवाच
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!

आणखी वाचा : “उत्तम नट, माणूस आणि घरमालक…” सतीश कौशिक यांच्याबद्दलची कार्तिक आर्यनची खास पोस्ट चर्चेत

चित्रपटातून लॉकडाउन दरम्यान लाखो लोक आपआपल्या घरी परतण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. याबरोबरच या लाखो सामान्य मजुरांना आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांना त्या काळात नेमक्या कोणत्या यातना सहन कराव्या लागल्या यावर कटाक्ष टाकण्यात आला आहे. या ट्रेलरमधून सरकारी यंत्रणा, राजकीय हेवेदावे, आणि लॉकडाउनदरम्यान सामान्य लोकांची मानसिकता अगदी अचूक टिपण्यात आली आहे. शिवाय लॉकडाउनच्या दरम्यान झालेलं स्थलांतर हे भारत पाकिस्तान फाळणी दरम्यान झालेल्या स्थलांतराइतकं दाहक असल्याचं दिग्दर्शकाने या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या विषयाबरोबरच जबरदस्त संवादही आपल्याला ऐकायला मिळत आहेत. चित्रपटात राजकुमार राव हा एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे आणि भूमी पेडणेकर, दिया मिर्झा यांचीही यात मुख्य भूमिका आहे. चित्रपटाच्या कथानकाला साजेसं असं खिळवून ठेवणारं पार्श्वसंगीतही आहे. याबरोबरच पंकज कपूर, आशुतोष राणा, विरेन्द्र सक्सेनासारखे मातब्बर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भीड’ हा चित्रपट २४ मार्चला देशभरात प्रदर्शित होणार आहे.