Gandhi Godse – Ek Yudh Trailer : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी कायमच आपल्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते लवकरच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली होती. यात मराठमोळा अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर नथुरामची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटाच्या टीझरलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकताच याचा ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला आहे. गांधी वधाचा सीननंतर नथुरामला अटक होऊन तो तुरुंगात दाखवण्यात आला आहे. मात्र यात एक वेगळा प्रयोग केला गेला आहे तो म्हणजे नथुराम आणि गांधी यांच्यातील वैचारिक मतभेद दाखवले आहेत. या चित्रपटात ते एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. म्हणूनच या चित्रपटाला एक वैचारिक युद्ध म्हणून सादर करण्यात आलं आहे.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

१९४७ मध्ये झालेली फाळणी आणि त्यांनंतर हिंदू आणि मुसलमान यांच्यात निर्माण झालेले वैमनस्य हे हुबेहुब संतोषी यांनी मांडलं आहे. शिवाय इतिहासाबरोबरच काल्पनिकतेची जोड या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे. यामध्ये महात्मा गांधी यांची भूमिका दीपक अंतानी यांनी साकारली असून नथुराम गोडसेची भूमिका चिन्मय मांडलेकरने साकारली आहे.

चित्रपटात गांधीहत्येच्या सीननंतर गांधी त्यातून बचावले आणि त्यांनी नथुरामला भेटायची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर या दोघांचं वैचारिक युद्ध आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे असं या ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. चित्रपटात गांधी आणि गोडसे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकांचीसुद्धा झलक बघायला मिळत आहे. राजकुमार संतोषी यांचं उत्तम दिग्दर्शन, दर्जेदार लिखाण आणि कलाकारांचा उत्तम अभिनय या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : Golden Globe Awards : ‘RRR’च्या ‘नाटू नाटू’ गाण्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक; म्हणाले…

तब्बल ९ वर्षांनी इतिहासातील एका महत्त्वाच्या आणि वादग्रस्त घटनेला हात घालायचं काम राजकुमार संतोषी करत आहेत. प्रेक्षक या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक असल्याचं दिसत आहे. या ट्रेलरलाही लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट २६ जानेवारी रोजी झळकणार आहे, शाहरुख खानच्या ‘पठाण’ला टक्कर देणाऱ्या या चित्रपटासाठी प्रेक्षक आतुर आहेत.