‘भूल भुलैया’ या चित्रपटात आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवणाऱ्या विनोदवीर राजपाल यादवचा आज वाढदिवस आहे. राजपाल यादवने बॉलिवूडमध्ये २० वर्षांहून अधिक काळ काम केलंय. त्याने विनोदी अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याची मेहनत फळाला आली आणि त्याचे विनोद व कॉमिक टायमिंगवर प्रेक्षक हसल्याशिवाय राहत नाहीत.

“उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे…” रोहित शेट्टीने सांगितलेलं मराठी कलाकारांना चित्रपटांत घेण्यामागचं कारण

राजपालने दोन लग्नं केली आहेत. राजपालच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. त्याला पहिल्या पत्नीपासून ज्योती नावाची मुलगी आहे. मुलीच्या जन्मावेळीच त्याची पत्नी अरुणाचा मृत्यू झाला होता. त्याने मुलीला एकट्याने वाढवलं होतं. राजपालने २०१७ मध्ये आपल्या मुलीचे एका बँक कॅशियरशी लग्न लावून दिले.

Video: कन्नड येत नसल्याने विमानतळ अधिकाऱ्याने दिला त्रास; संतापलेला सलमान व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आपल्या पंतप्रधानांना…”

दरम्यान, राजपालने दुसरं लग्न केलं आणि तो प्रेमविवाह होता. त्याची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. राजपाल त्याच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान असलेल्या मुलीच्या प्रेमात पडला होता, तोही अवघ्या १० दिवसांत. तो सनी देओलबरोबर ‘द हीरो’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. २००२ मध्ये तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी कॅनडाला गेला होता. तेव्हा तो राधाला भेटला. राधा एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून राजपालला भेटली होती. दोघांची पहिली भेट कॅनडातील एका कॉफी शॉपमध्ये झाली होती.

Video: “भारतातल्या मुली आळशी” मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “त्यांना असा नवरा हवा जो…”

कॉफी शॉपमध्ये दोघांनी गप्पा मारल्या, त्यानंतर राजपाल १० दिवस राधाच्या संपर्कात होता. यानंतर दोघांनीही एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली. राजपाल १० दिवसांनी भारतात परतला, नंतर फोनवरून ते एकमेकांशी बोलायचे. असेच १० महिने गेले. त्यानंतर राजपाल आणि राधा या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २००३ मध्ये लग्न केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजपाल यादवने एका मुलाखतीत सांगितले होते की, राधा त्याच्यापेक्षा एक इंच उंच आहे. तसेच ती त्याच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान आहे.