Rakesh Roshan’s Khandala Mansion : अभिनेता हृतिक रोशनचे वडील व लोकप्रिय चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनी ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’ यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अशातच आता ते सध्या चर्चेत आलेत ते त्यांच्या नव्या आलिशान बंगल्यामुळे. राकेश रोशन यांनी नुकतंच एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.

राकेश रोशन यांनी दिग्दर्शिका फराह खानला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आलिशान बंगल्याची सफर घडवली आहे. त्यांच्या या बंगल्याची किंमत तब्बल १२० कोटी इतकी आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, “माझा जन्म गॅरेजमध्ये झालेला, त्यामुळे माझं पूर्वीपासून स्वप्न होतं की, मला खूप मोठं घर घ्यायचं आहे.”

राकेश रोशन यांचं खंडाळा येथील २२,४९९ एसक्यू. आलिशान घर ५ एकरमध्ये पसरलेलं आहे. त्यांच्या घराजवळ आजूबाजूला हिरवागार निसर्ग, डोंगर असा निसर्गरम्य परिसर पाहायला मिळतो. राकेश रोशन यांच्या आलिशान बंगल्यामध्ये मोठा स्वीमिंग पूल आणि सुंदर असं गार्डनही पाहायला मिळतं. बंगल्याच्या मुख्य दरवाज्याजवळ मोठा स्वीमिंग पूल आहे. त्यालगतच सुंदर असं गार्डनही आहे.

फराह खानच्या ब्लॉगमध्ये, ती घरात प्रवेश करते तेव्हा तिथे झाडांशेजारी विवध शोभेच्या सुंदर गोष्टी ठेवल्याचं पाहायला मिळतं. बंगल्यामध्ये मोठं गॅरेजही आहे, जिथे रोशन कुटुंबीयांतील सदस्यांच्या गाड्यांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

राकेश रोशन यांच्या आलिशान बंगल्यामध्ये मोठा परिसर असून अनेक मोठ्या खोल्या आहेत. लांबलचक बाल्कनी, त्यात ठेवलेल्या शोभेच्या महागड्या वस्तू, काचेच्या खिडक्या, पेंटिंग्स या गोष्टी दिसत आहेत.

राकेश यांच्या आलिशान बंगल्यात सिनेमात असतात तशा मोठ्या शिड्या आहेत. यामध्ये राकेश यांनी घरातील सर्व गोष्टी भारतातल्याच असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या घरात बेडरूम साईज बाथरूम आहेत. खंडाळा येथील राकेश यांच्या बंगल्यामधील खोल्या तर प्रचंड मोठ्या आहेतच, पण फराह खानचं लक्ष वेधलं ते त्यातील बाथरूमने. ती त्यावेळी म्हणाली, “हे कोणाचे तरी बेडरूम असू शकते. मुंबईत बेडरूमही यापेक्षा लहान असतात.”

राकेश यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं की, त्यांनी सर्व गोष्टींचं वेगळेपण जपलं जाईल याची काळजी घेतली आहे, त्यामुळे प्रत्येक खोलीला वेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्यात आलं असून त्यातील खिडक्या, फर्निचर या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे.