राखी सावंत व तिचा पती आदिल खान यांच्यामधील वाद अजूनही सुरुच आहे. राखीने आदिलवर फसवणूक व मारहाणीसारखे गंभीर आरोप केले. त्याचबरोबरीने त्याचं दुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर असून तिच्याशी आदिलने लग्न केलं असल्याचंही राखीने सांगितलं. राखीच्या तक्रारीनंतर ओशिवारा पोलिसांनी आदिलला ७ फेब्रुवारीला अटक केली. आता तिने आदिलच्या कुटुंबियांबाबत पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – “बायकोला पहिल्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं अन्…” ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

प्रसारमाध्यमांशी बोलताना राखी आईचं नाव घेत ढसाढसा रडू लागली. तसेच यावेळी तिने आदिलच्या कुटुंबियांबाबत वक्तव्य केलं. राखी म्हणाली, “मला न्याय हवा आहे. मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मी आदिलबरोबर लग्न केलं. लग्न केलं असल्याचे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत.”

“पण आता आदिलचे कुटुंबीय मला म्हणत आहेत की, तू हिंदू आहेस म्हणून आम्ही तुझा स्वीकार करू शकत नाही. असं जर माझ्याबरोबर घडत असेल तर मी कुठे जाऊ? मी आता काय करू? तो मला खूप त्रास देत आहे. सध्या माझी प्रकृतीही ठिक नाही.” असं म्हणत राखी तिच्या आईच्या नावाने रडू लागली.

आणखी वाचा – Video : पती तुरुंगात असताना अशी झाली आहे राखी सावंतची अवस्था, रडता रडता रस्त्यावरच बसली, म्हणाली, “त्या मुलीचे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिल खानला अटक केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर १६ फेब्रुवारीला आदिलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी(२० फेब्रुवारी) पुन्हा आदिलची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. राखी व आदिलमधील हा वाद आणखीन किती वाढणार हे येणार काळच सांगू शकेल.