scorecardresearch

Video: “आमचं लग्न खोटं, मौलानाही खोटा…” राखी सावंतला संताप अनावर

आतापर्यंत राखी सावंतने आदिल खानबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तर आता त्यापाठोपाठ तिने त्याच्या कुटुंबियांबद्दल राग व्यक्त केला.

rakhi sawant

राखी सावंत सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. राखी सावंतचा पती आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर आहे असा धक्कादायक खुलासा राखीने केला होता. त्याचबरोबर आदिलविरुद्ध तिने मारहाण केल्याचीही तक्रार केली होती. राखीच्या तक्रारीनंतर आदिल खानला ७ फेब्रुवारी रोजी ओशिवरा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आता त्याला १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

आदिल खानला अटक झाल्यानंतरही राखी सावंतने त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. आदिलने तिचे न्यूड व्हिडीओ काढून ते विकले असंही राखी म्हणाली होती. तर आता आदिल पाठोपाठ राखीने त्यांच्या घरच्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : “आदिलने माझे न्यूड व्हिडीओ काढले आणि…” राखी सावंतचा धक्कादायक खुलासा

राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती म्हणाली, “त्याच्या कुटुंबीयांनी तरी मला पाठिंबा द्यायला हवा. आदिल तर मला सपोर्ट करत नाहीये. आता मी न्याय मागायला कोणाकडे जाऊ? कुठे जाऊ? आदिलच्या कुटुंबीयांना सगळं माहीत होतं. आमच्या रजिस्टर लग्नाबद्दल मी त्यांना आठ महिने आधीच सांगितलं होतं. त्याचबरोबर सगळी कागदपत्रंही दिली होती. त्याच्या काकूपासून त्याच्या आईपर्यंत सगळ्यांना याबद्दल माहीत होतं. तरीही त्यांनी आदिलचा साखरपुडा केला.”

हेही वाचा : Video: “मला आई व्हायचं होतं पण त्याने…” राखी सावंतचा आदिल खानबद्दल मोठा खुलासा

पुढे ती म्हणाली, “मी आदिलचे वडील, त्याची आई, त्याची काकू कोणाशीही फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला तर ते माझा फोन कट करतात. तुम्हाला काय वाटतं मी बॉलिवूड सेलिब्रिटी आहे तर आम्ही बॉलिवूडवाले काय खोटं बोलतो? म्हैसूरमधील एका मुलीने आदिलविरोधात बलात्काराची तक्रार केली आहे. तिच्यावर अन्याय झाला आहे. ती मुलगी तर सर्वांसमोरही आलेली नाही. माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग आहेत. आदिलची गर्लफ्रेंड म्हणते की “राखी माझी बायको नाही” असं आदिलने तिला सांगितलं आहे. ही सगळी कागदपत्रं खोटी आहेत, आमचं लग्न खोटं आहे, मौलानाही खोटा आहे. आज नाहीतर उद्या आदिलला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट नक्की मिळणार. मला न्याय मिळो आणि आदिलला जामीन न मिळो अशी तुम्ही प्रार्थना करा.” आता तिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 11:30 IST
ताज्या बातम्या