scorecardresearch

Video: तुरुंगात असलेल्या पतीकडून राखी सावंतला धमकी; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “डॉनला…”

आदिल खानने राखीला दिली जीवे मारण्याची धमकी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

rakhi sawant on adil khan (2)
राखी सावंतला आदिलकडून जीवे मारण्याची धमकी. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीच्या संसारात वादळ आलं आहे. पती आदिल खानच्या अफेअरचा खुलासा केल्यानंतर राखीने पतीविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर आदिलला ७ फेब्रुवारीला ओशिवारा पोलिसांनी अटक केली होती. आज पुन्हा आदिलला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

आता न्यायालयाने आदिलची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. राखीचा कोर्टाबाहेरील नवा व्हिडीओ समोर आला आहे. तुरुंगात असलेल्या आदिलची भेट घेतल्याचं राखीने सांगितलं आहे. यावेळी आदिलने माझ्याबरोबर नीट संवाद साधला नसल्याचं राखी म्हणाली होती. त्यानंतर आता आदिलने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा खुलासा राखीने केला आहे. राखी म्हणाली, “तिहार तुरुंगात मी खूप मोठमोठ्या डॉनला भेटलो आहे. तुला काय करायचं आहे, याबाबत विचार कर. मी बाहेर आल्यावर तुझं काय होईल? असा धमकीवजा इशारा मला आदिलने दिला आहे”.

हेही वाचा>> राखी सावंत प्रकरणावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया, म्हणाले “आदिल खानला…”

हेही वाचा>> Video: “जान, वापस आ जाओ” राखी सावंतने पती आदिलसाठी कॅमेऱ्यासमोरच फोडला टाहो, म्हणाली “लग्नानंतर पहिल्या रमझानमध्ये…”

“मी घाणेरड्या आर्थर रोड जेलमध्ये राहिलो. तुरुंगात मी लोकांसाठी चहा बनवला. त्यांचे पाय दाबून दिले. भांडी घासली. यापेक्षा वाईट माझ्याबरोबर काय होऊ शकतो, असंही मला आदिल म्हणाला”, असंही राखीने सांगितलं आहे. राखी व्हिडीओत भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. “आदिलबरोबरच्या आठवणी मला विसरुन जायच्या आहेत. पण यासाठी काही काळ जावा लागणार आहे. हे सगळं विसरायला मला वेळ लागेल”, असंही पुढे राखी म्हणाली.

हेही वाचा>> सलमान खानने दिलं ब्रेसलेट, गर्लफ्रेंडने गिफ्ट केली बाईक अन्…; ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन मालामाल

राखी सावंतने पती आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मारहाण व फसवणूक केल्याबरोबरच अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोपही राखीने आदिलवर केला आहे. अटकेनंतर आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १६ फेब्रुवारीला आदिलला कोर्टात हजर करण्यात आलं होत. त्यानंतर न्यायालयाने आदिलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 19:41 IST