अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. राखीने पतीविरोधात तक्रार केल्यानंतर आदिलला ७ फेब्रुवारीला ओशिवारा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १६ फेब्रुवारीला आदिलला कोर्टात हजर करण्यात आलं होत. त्यानंतर न्यायालयाने आदिलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

राखीचा पती आदिल खानला आज पुन्हा अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने आदिलला रवानगी आता न्यायालयीने कोठडीत केली आहे. आदिलचे वकील नीरज गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आदिलच्या वकिलांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आदिलचे वकील म्हणाले, “आदिलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज आदिलला म्हैसूर पोलीस चौकशीसाठी घेऊन जाणार आहेत.त्याच्यावर म्हैसूरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. म्हैसूर पोलिसांच्या चौकशीसाठी आदिलला न्यायालयीन कोठडी आवश्यक होती. त्याशिवाय त्यांना आदिलची चौकशी करता आली नसती”.

हेही वाचा>> सलमान खानने दिलं ब्रेसलेट, गर्लफ्रेंडने गिफ्ट केली बाईक अन्…; ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन मालामाल

“आदिलच्या जामीनासाठी आम्ही विनंती अर्ज दाखल केला आहे. आदिलला लवकरच जामीन मंजूर होईल, अशी आम्हाला खात्री आहे”, असंही पुढे आदिलचे वकील म्हणाले. दरम्यान, आदिलवर इराणी महिलेने म्हैसूरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतही त्याची चौकशी होणार आहे.

हेही वाचा>> राखी सावंत प्रकरणावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया, म्हणाले “आदिल खानला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी सावंतने पती आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मारहाण व फसवणूक केल्याबरोबरच अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोपही राखीने आदिलवर केला आहे. आदिलचं अफेअर असल्याचंही राखीने उघड केलं होतं.