बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. राखीने पती आदिल खानवर अनेक गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मंगळवारी(७ फेब्रुवारी) ओशिवारा पोलिसांनी आदिलला अटक करत त्याला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली होती.

आदिलला अटक केल्यानंतर राखीचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. आता राखीने पुन्हा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने हिजाब परिधान केल्याचं दिसत आहे. “अल्लाहसमोर जो नतमस्तक होतो, त्याला कोणाच्याही पुढे झुकावं लागत नाही” असा ऑडिओ तिने व्हिडीओला दिला आहे. या व्हिडीओत ती लिप्सिंग व ऑडिओवर अक्शन करतानाही दिसत आहे.

हेही वाचा>> आदिल खानच्या अटकेनंतर राखी सावंतला मिळाली धमकी; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “माझे व्हिडीओ…”

हेही वाचा>> “तशी फिगर नसल्यामुळे…”, अमृता खानविलकरने सांगितला हिंदी सिनेमात काम करण्याचा अनुभव

राखीने हिजाब घालून आज कोर्टातही हजेरी लावली. आदिलला अटक केल्यानंतर धमकी मिळाल्याचा खुलासा राखीने केला आहे. आदिलने शूट केलेले माझे न्यूड व्हिडीओ व्हायरल करणार असल्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक खुलासा राखीने केला आहे. याबरोबरच राखीने आदिलवर मारहाण व फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत.

हेही पाहा>> Photos: अटक झालेला राखी सावंतचा पती तिच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान, जाणून घ्या आदिल खानची एकूण संपत्ती

राखी व आदिलने मे २०२२मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. सात महिन्यांनंतर राखीने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. अनेक दिवसांच्या ड्राम्यानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं. त्यानंतर काहीच दिवसांनी राखीने आदिलच्या अफेअरबाबत खुलासा केला होता. राखीने कॅमेऱ्यासमोर येत आदिलच्या गर्लफ्रेंडचं नावही जाहीर केलं होतं.