राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुर्रानी यांच्यातील वाद संपण्याचं नाव घेत नाहीये. दोघांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. राखीने व एका इराणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर आदिल खान सहा महिने तुरुंगात होता. त्याची जामिनावर सुटका झाली असून बाहेर आल्यापासून तो राखीने केलेले आरोप खोटे असल्याचं म्हणत आहे. इतकंच नाही तर राखीने आपले पैसे घेतले आणि आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्याचाही दावा केला होता. अशातच आता तनुश्री दत्ताने या प्रकरणात उडी घेतली असून ती आदिलला पाठिंबा देत आहे.

“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”

आदिल व तनुश्रीने दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर राखीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये आदिल खान इराणी मुलीची बोलताना ऐकू येत आहे. संपूर्ण कॉल दरम्यान ती मुलगी घाबरलेली होती, असं राखीने म्हटलंय. आदिल तिला व तिच्या कुटुंबाला फसवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून ती राखीकडून मदत घेते. राखीने तिला व्हिडीओमध्ये बहीण म्हटलं. तसेच आपण तुला काहीही होऊ देणार नसल्याचं ती म्हणाली.

“ते आधीच रस्त्यावर आले आहेत”, तनुश्री दत्ता नाना पाटेकरांचा एकेरी उल्लेख करत म्हणाली, “त्यांची लायकी…”

राखीने कॅप्शन लिहिलं, “आदिल खानची एक्स गर्लफ्रेंड इराणी मुलगी. आदिल तिला मारण्याची धमकी देत आहे कारण ती खरं बोलली. तिने तिचं आयुष्य बरबाद करणाऱ्या आणि तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या आदिलबद्दल पोलिसांत तक्रार दिली. तिच्यामुळे तो सहा महिने म्हैसूर तुरुंगात होता. हे ऑडिओ काळजीपूर्वक ऐका. इराणी मुलीच्या जीवाला धोका आहे. मला तिची काळजी वाटत आहे कारण आदिलने मला सांगितले होतं की त्याच्यावर बलात्काराच्या केसमुळे तो तिला सोडणार नाही. हे सर्व पुरावे तुमच्या समोर आहेत नीट ऐका. तिने मला कॉल केला आणि हा ऑडिओ आहे. जेव्हा ती म्हैसूरला होती तेव्हा तिने काही महिन्यांपूर्वी मला फोन केला होता.”

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी आणि आदिल दोघेही नुकतेच त्यांच्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टाबाहेर दिसले. आदिलसोबत तनुश्री दत्ता होती. तिने सांगितलं की ती आदिलला पूर्ण पाठिंबा देईल आणि सर्वांवर खोटे आरोप केल्याबद्दल राखीला तिची जागा दाखवेल. राखी सावंत आणि तिचे वकील अली काशिफ खान यांनी आदिलचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला असून त्याच्याविरुद्ध २१ सप्टेंबर रोजी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा खटलाही दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणांची सुनावणी ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.