राखी सावंत सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. तिच्या संसारात वादळ निर्माण झालं आहे. राखीशी लग्न केल्यानंतर तिचा पती आदिल खान दुसऱ्या एका मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, तो राखीला मारहाणही करायचा अशी राखीने तक्रार केली होती. राखीने आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ओशाविरा पोलिसांनी त्याला ७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर आदिल आता १४ दिवस न्यायालयीन कोठडीत असणार आहे. आताही राखी आदिलच्या त्या मुलीशी असलेल्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
आदिल विरुद्ध तक्रार केल्यानंतर राखी त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल तसंच आदिलबद्दल राखी नवनवीन खुलासे करत आहे. दोन दिवसापूर्वीच राखी सावंतने आदिलने तिचे न्यूड फोटो शेअर केले असा धक्कादायक खुलासा केला होता. तर आता आदिलची गर्लफ्रेंड तनु प्रेग्नंट असल्याचं ती म्हणाली आहे.
आणखी वाचा : “आदिलने माझे न्यूड व्हिडीओ काढले आणि…” राखी सावंतचा धक्कादायक खुलासा
सध्या राखीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती म्हणते, “आदिलला जामीन मिळालेला नाही. माझ्यासाठी तर सगळंच धक्कादायक आहे. आधी आदिलच्या लग्नाची बातमी आणि आता त्याची गर्लफ्रेंड तनु प्रेग्नंट आहे असं मला कळलं. म्हणूनच तो जेलमधून बाहेर पडल्यावर तिच्याशी लग्न करणार आहे. याबद्दल मला फार काही माहीत नाही पण तनुने सर्वांसमोर येऊन स्पष्ट केलं पाहिजे की ती प्रेग्नंट आहे की नाही. त्यासोबतच मला मुंबई पोलीस, भारतीय पोलीस, म्हैसूर पोलीस यांचे आभार मानायचे आहेत कारण त्यांच्यामुळे एवढी मोठी गोष्ट समोर आली.”
दरम्यान मे २०२२ मध्ये राखी सावंत आणि आदिल खान यांनी लग्न केलं होतं. अनेक महिने ती दोघं विवाहबद्ध असल्याचं त्यांनी लपवलं होतं. गेल्या महिन्यातच राखीने आदिलशी लग्न केल्याचे जाहीर केलं. तर आता राखीने आदिलपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.