Ramayana actor Indira Krishnan on casting couch: लोकप्रिय अभिनेत्री इंदिरा कृष्णन या लवकरच ‘रामायण’ या चित्रपटात दिसणार आहेत. रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात त्या कौशल्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

इंदिरा कृष्णन यांनी काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतींमध्ये अभिनेता रणबीर कपूरबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला होता. अभिनेत्याच्या स्वभावाचे, त्याच्या कामाचे त्यांनी कौतुक केले होते. तसेच, वडील म्हणून रणबीर कसा आहे, याबाबतही वक्तव्य केले होते.

इंदिरा कृष्णन नेमकं काय म्हणाल्या?

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्रीने कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. महिलांना आजही असुरक्षित वातावरणात काम करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, हिंदी इंडस्ट्रीपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत असताना अधिक कास्टिंग काऊचचा अनुभव आल्याचा खुलासा त्यांनी केला. तसेच, लोकांनी केलेल्या मागण्या पूर्ण न केल्याने अनेक प्रोजेक्ट गमवावे लागले, असेही त्यांनी म्हटले.

इंदिरा कृष्णन यांनी नुकतीच बॉलीवूड बबलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाल्या, “मला कास्टिंग काऊचला एकदा नाही तर अनेकदा सामोरे जावे लागले आहे. मुंबईत किंवा हिंदी चित्रपटांत काम करताना मला असा अनुभव फारसा आला नाही. पण, दाक्षिणात्य चित्रपटांत का करताना मला हा अनुभव बऱ्याचदा आला आहे.

“एका मोठ्या निर्मात्याबरोबर एक मोठा प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली होती. त्या प्रोजेक्टविषयी आमच्यात काही मतभेद होते.पण, मी तो प्रोजेक्ट करणार होते. पण, अगदी शेवटच्या क्षणी असे काहीतरी घडले, ज्यामुळे मी त्यातून माघार घेतली. एक वाक्य, एक ओळ, एक विधान आणि सगळं काही संपते. एका छोट्याशा गोष्टीने संपूर्ण नाते खराब होते.”

“मला आजही आठवतंय की मी त्यावेळी विचार करत होते, हा प्रोजेक्टदेखील माझ्या हातातून चालला आहे. पण, तो निर्माता ज्या पद्धतीने बोलत होता, त्याच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. त्याबरोबरच त्याचा दबावही वाढत होता. मला वाटलं की मी ती परिस्थिती हाताळू शकणार नाही. मी विचार केला की जर उद्या शूट सुरू झाल्यानंतर हे नातं बिघडू शकते. त्यामुळे मी त्या निर्मात्याला मेसेज केला. त्याला त्या मेसेजमध्ये लिहिले की मी माझे टॅलेंट विकण्यासाठी आले आहे, स्वतःला नाही.कदाचित माझे शब्द थोडे कठोर होते. पण मला वाटते की आपण जितके स्पष्ट असू तितके चांगले असते. पुढे जाण्यास तुम्हाला या गोष्टीची मदत होते.”

पुढे इंदिरा कृष्णन म्हणाल्या, “कास्टिंग काऊचमुळे मी काही चांगले प्रोजेक्ट गमावले आहेत. अशाच गोष्टींमुळे मी टेलिव्हिजनकडे वळले. टेलिव्हिजनवर काम करताना मला अधिक कार्यक्षमतेने काम करता आले. या इंडस्ट्रीमध्ये पुरेसा आदरही मिळाला. टीव्ही इंडस्ट्रीमध्येही बऱ्याच गोष्टी घडतात. पण, त्या टप्प्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपण सगळ्यांनीच अशा अनेक गोष्टी अनुवलेल्या असतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंदिरा कृष्णन यांच्या कामाबाबत बोलायचे तर ‘कृष्णाबेन खाखरवाला’, कृष्णदासी, मंझिले अपनी अपनी, कभी आये ना जुदाई, वारीस, ‘रहे तेरा आशीर्वाद’, ‘तुम ऐसे ही रेहना’ आणि ‘फिरंगी बहू’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. याबरोबरच, ‘आज का रावण’, ‘तेरे नाम’, ‘हॉलिडे: ए सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी’, ‘हे ब्रो’ आणि ‘ॲनिमल’ सारख्या चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.