Ranbir Kapoor and Alia Bhatt’s Dream Bungalow : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट व रणबीर कपूर यांचा नवीन आलिशान बंगला काही दिवसांपासून अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. अनेकदा त्यांच्या नवीन घराबद्दल चर्चा केली जाते. अशातच आता या जोडीच्या नवीन आलिशान बंगल्याचा पूर्ण लूक पहिल्यांदाच समोर आला आहे.
आलिया व रणबीर यांच्या मुंबईतल्या वांद्रे येथील २५० कोटींच्या आलिशान बंगल्याचं बांधकाम पूर्ण झालं आहे. मुंबईच्या पॉश एरियामध्ये असलेला त्यांचा हा सहा मजली बंगला खूपच सुंदर व निसर्गरम्य ठिकाणी असल्याचं समोर आलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळतं. सोशल मीडियावर त्यांच्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आलिया व रणबीर यांच्या बंगल्याचा व्हिडीओ एक्सवर एका नेटकऱ्यानं शेअर केला. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये रणबीर-आलियाच्या आलिशान बंगल्याभोवती हिरवागार परिसर असून, त्याजवळ अनेक झाडं असल्याचं पाहायला मिळतं. त्याशिवाय त्यांच्या बंगल्याच्या प्रत्येक मजल्यावरही छोटी छोटी रोपं लावलेली असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसऱ्या मजल्यावर हॉल असून, त्यामध्ये आलिशान व लक्ष वेधून घेणारं झुंबरं लावलेली असल्याचंही पाहायला मिळतं. त्यांच्या या बंगल्याचं नाव कृष्णराज असून, हे नाव रणबीरचे आजोबा दिवंगत अभिनेते राज कपूर व आजी कृष्णा कपूर यांच्या नावांचा मिलाफ करून देण्यात आलं आहे.
रणबीर-आलिया यांच्या या बंगल्याजवळच समुद्र असल्यानं त्यांना सी व्ह्युदेखील पाहायला मिळणार आहे. लवकरच हे जोडपं त्यांच्या नवीन घरात राहायला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. अनेकदा रणबीर, आलिया व नीतू सिंह हे तिघे त्यांच्या कृष्णराज या आलिशान बंगल्याला भेट देताना दिसतात.
‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार रणबीर व आलिया यांच्या आलिशान बंगल्याचं बांधकाम पूर्ण झालं असलं तरी त्यामध्ये अजून काही गोष्टी पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ जाईलं. महिनाभरात हे काम पूर्ण होणार असल्याचं म्हटलं जात आहे. हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर रणबीर व आलिया त्यांच्या लेकीबरोबर या नवीन घरात राहायला जाणार असून, यंदाची दिवाळी ते याच घरात साजरी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशातच नुकतच वैयक्तीक सुरक्षा लक्षात घेऊन आलिया भट्टने तिच्या घरासंबंधीत कोणताही फोटो व व्हिडीओ वापरण्यास मनाई केली आहे.