‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. आपलं काम सांभाळून तो नेहमीच कुटुंबीयांसाठी वेळ काढत असल्याचं आपण पाहिलं आहे. २०२२ मध्ये रणबीरने आलिया भट्टशी लग्न केलं. या जोडप्याला राहा नावाची गोड मुलगी आहे. अभिनेता राहाची उत्तम काळजी घेत असल्याचं आपण अनेक व्हायरल व्हिडीओमध्ये पाहिलं आहे. नुकतीच त्याने आई नीतू आणि बहीण रिद्धिमासह कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी या कुटुंबाने एकत्र धमाल केल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

रणबीर कपूरचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. विशेषत: मुलींमध्ये तो जास्त लोकप्रिय आहे. अशातच कपिल शर्माच्या शोमध्ये रणबीरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक खुलासा केला आहे. हा किस्सा ऐकून सगळेच प्रेक्षक थक्क झाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : बिहारचं राजकारण, सेटवरची मराठमोळी बांधिलकी ते बॉलीवूडचा अनुभव! ‘महाराणी’च्या जगात पाऊल टाकणारा मराठी दिग्दर्शक

कपिल शर्मा यावेळी अभिनेत्याच्या बहिणीला विचारतो, “मी असं ऐकलंय की, रणबीर कपूर गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी रिद्धिमा कपूरचे कपडे गिफ्ट म्हणून द्यायचा…” यावर अभिनेता हसत-हसत म्हणतो, “अरे कपडेच नाही मी माझ्या आईचे दागिने पण गिफ्ट म्हणून दिलेत.”

रणबीरने केलेला खुलासा ऐकून कार्यक्रमात एकच हशा पिकतो. याशिवाय या शोमध्ये कपूर कुटुंबीयांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित अनेक खुलासे केले. सध्या याचा प्रोमो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “अजूनही त्यांनी माझं एक काम केलेलं नाही, ते म्हणजे…”; अमित ठाकरेंनी वडिलांबाबत भर कार्यक्रमात व्यक्त केली खंत

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोमध्ये नेहमीप्रमाणे कपिल शर्मा होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. याशिवाय सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर, अर्चना पूरन सिंह आणि कीकू शारदा त्याला साथ देतील. येत्या ३० मार्चपासून नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो सुरू होणार आहे.