बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेला ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. या चित्रपटातील गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केलेल्या रणबीर व श्रद्धाची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणबीर व श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी १५.७३ कोटींचा गल्ला जमवला. होळी आणि धुळवडीच्या सुट्ट्यांमुळे या चित्रपटाला फायदा झाल्याचं दिसून आलं. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०.३४ कोटींची कमाई केली. पहिल्या दोनच दिवसांत रणबीर-श्रद्धाच्या चित्रपटाने २६.०७ कोटींची कमाई केली आहे. वीकेएण्डला हा आकडा आणखी कमाई करण्याची अपेक्षा वर्तविण्यात आली होती.

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर हीट ठरलेला रणबीर-श्रद्धाचा ‘तू झूठी मैं मक्कार’ लवकरच ओटीटीवर; वाचा कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

अपेक्षेप्रमाणे वीकेएण्डलासुद्धा चित्रपटाने जबरदस्त कमाई केल्याचं स्पष्ट झालं आहे. शनिवारी तब्बल १६ कोटी इतकी कमाई करून या चित्रपटाने चार दिवसांतच ५० कोटीचा आकडा पार केला आहे. चार दिवसांत या चित्रपटाने ५२.५९ कोटी रुपये कमावले आहेत. इतकंच नव्हे तर रविवारी यात आणखी भर पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रविवारी हा चित्रपट १७ कोटीपेक्षा जास्त कमाई करेल, पण सोमवारी मात्र याच्या आकड्यांमध्ये तफावत दिसू शकते असं तज्ञांचं म्हणणं आहे.

रणबीर व श्रद्धाच्या या चित्रपटाने आयएमडीबी रेटिंगमध्ये शाहरुख खानच्या पठाणला टक्कर दिली आहे. ‘पठाण’ला आयएमडीबीवर १० पैकी ६.४ असं रेटिंग मिळालं आहे तर रणबीर श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी १० पैकी ६.७ असं रेटिंग मिळालं आहे. यामध्ये रणबीर आणि श्रद्धासह डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor shraddha kapoor starrer tu jhoothi main makkar box office collection day 4 avn
First published on: 12-03-2023 at 12:15 IST